भारत आणि इंग्लंड यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली. त्यामधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांच्या संघामध्ये बदल करण्यात आला होता. या सामन्यात वारंवार फलंदाजीमध्ये अपयशी ठरत असलेल्या केएल राहुलला वगळून टी नटराजनला भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली होती. या बदलामागील कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने उघड केले आहे.
पाचव्या सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर कोहलीने सांगितले की, “आम्ही आज संघात बदल केला असून आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगला समतोल साधायचा होता. तसेच सूर्यकुमार हा आमच्या संघाचा एक्स फॅक्टर असून आणि त्याला शक्य तितकी संधी देण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे केएल राहुल आजचा सामना खेळणार नसून त्यांच्या जागी नटराजन यांना संधी देण्यात आली आहे.”
विराट कोहलीच्या या रणनीतीचा भारतीय संघाला फायदा झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला 36 धावांनी पराभूत करून मालिका 3-2 ने जिंकली. या सामन्यात टी नटराजनने बेन स्टोक्सची महत्त्वपूर्ण विकेट घेतली, जो शेवटच्या क्षणी भारतासाठी धोकादायक ठरू शकला असता.
भारत-इंग्लंड यांच्यातील टी20 मालिकेच्या पहिल्या 4 सामन्यात केएल राहुल सलामीला फलंदाजी करताना अपयशी ठरला. या मालिकेत त्याने एकूण 15 धावा केल्या आहेत. गेल्या 4 सामन्यात त्याची वैयक्तिक धावसंख्या 1,0,0,14 अशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ
वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचे पुण्यात झाले आगमन, पाहा फोटो
आयपीएल २०२१ सुरुवात होण्याआधीच राजस्थानला जबरदस्त धक्का, ‘हा’ खेळाडू मुकणार सुरुवातीचे सामने