लंडन। भारताचा इंग्लंड दौरा नुकताच संपला. या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी मालिकेत 4-1 ने पराभव स्विकारावा लागला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताकडून केएल राहुल आणि रिषभ पंतने शतके केली होती.
हे शतक करताना रिषभने एक खास विक्रमही रचला आहे. त्याने हे शतक कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात केले होते. त्यामुळे तो कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक बनण्याचा पराक्रम केला आहे.
याबरोबरच त्याने भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीचाही विक्रम मोडला आहे. भारतीय यष्टीरक्षकाने कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करण्याचीही विक्रम आता रिषभच्या नावावर नोंदवला गेला आहे.
याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने 2007 ला लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात चौथ्या डावात नाबाद 76 धावा केल्या होत्या.
रिषभच्या या विक्रमाबद्दल आयसीसीने ट्विटरवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. रिषभने या सामन्यात चौथ्या डावात 146 चेंडूत 114 धावा केल्या होत्या. यात 15 चौकार आणि 4 षटकार मारले होते.
मात्र भारताला या सामन्यात 118 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
कसोटी सामन्यात चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय यष्टीरक्षक-
114 धावा – रिषभ पंत
76* धावा – एमएस धोनी
67* धावा – पार्थिव पटेल
63 धावा – दीप दासगुप्ता
60 धावा – दीप दासगुप्ता
Did you know @RishabPant777 is the only Indian wicketkeeper to score a century in the fourth innings of a Test? #ENGvIND #howzstat pic.twitter.com/ULV9Cuv5gA
— ICC (@ICC) September 15, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–ओळख एशिया कप २०१८ मधील ‘अ’ गटाची
–ओळख एशिया कप २०१८ मधील ‘ब’ गटाची
–एशिया कप २०१८: भारतीय संघाच्या मदतीसाठी दुबईला जाणार हे गोलंदाज
–Video: शोएब मलिक आणि एमएस धोनी यांच्या सरावादरम्यान रंगल्या गप्पा