मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील आज पाचव्या दिवशी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक खास विक्रम रचला आहे. ब्रॉडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आज ५०० विकेट्सचा टप्पा पार केला.
वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज क्रेग ब्रेथवेट ब्रॉडची ५०० वी विकेट ठरला. ब्रॉड कसोटीमध्ये ५०० विकेट्स घेणारा एकूण ७ गोलंदाज ठरला आहे. तर इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचा दुसराच गोलंदाज ठरला.
???? 5️⃣0️⃣0️⃣ WICKETS ????
Stuart Broad has become just the 7th bowler in the history of the game to take 500 Test wickets! ???????????? #ENGvWI pic.twitter.com/3FtgslBTxm
— ICC (@ICC) July 28, 2020
२००६ ला आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या ब्रॉडने मागील अनेक वर्षांत उच्च दर्जाची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे हा तोच ब्रॉड आहे, ज्याला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने २००७ च्या टी२० विश्वचषकात ६ चेंडूत ६ षटकार लगावले होते. त्यावेळी केवळ २१ वर्षांचा असलेला स्टुअर्ट ब्रॉड तेव्हा खचला नाही.
त्याने स्वत:वर मेहनत घेत तो इंग्लंड संघाचा प्रमुख गोलंदाज बनला. विशेष म्हणजे २००७ च्या टी२० विश्वचषकावेळी स्टुअर्ट ब्रॉड एकही कसोटी सामना खेळला नव्हता परंतु आज त्याच्या नावावर तब्बल १४० कसोटी सामने आहेत आणि ५०० विकेट्स आहेत. तसेच ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७३० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
#OnThisDay in 2007…@YUVSTRONG12 v @StuartBroad8.
6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣ ????
Six sixes in an over, and the fastest ever T20I fifty, off just 12 balls! ???? pic.twitter.com/xYylxlJ1b6
— ICC (@ICC) September 19, 2018
आता ब्रॉड ३४ वर्षाचा आहे तरी सुद्धा तो उत्तम वेगाने गोलंदाजी करतो. सध्या तो आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत १०व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोणत्या गोलंदाजाने कोणत्या वर्षात घेतली आपली ५००वी विकेट, वाचा थोडक्यात
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारे ७ गोलंदाज, केवळ एक आहे भारतीय
५०० विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने या ५ फलंदाजांना अक्षरश: रडवलंय, धोनी- रहाणे देखील…
ट्रेंडिंग लेख –
गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….
भारतीय संघातील ५ सक्रिय खेळाडू ज्यांनी खेळलाय फक्त एक कसोटी सामना
आश्चर्यकारक! अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २०पेक्षाही कमी धावांवर सर्वबाद झालेत हे २ संघ






