---Advertisement---

IND vs BAN; कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही तुटणार चाहत्यांचे हृदय? हवामान अंदाज काय?

On: शनिवार, सप्टेंबर 28, 2024 8:18 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 107 धावांवरती खेळत आहे. त्यानंतर पावसानेच फलंदाजी सुरू केली आहे. पहिल्या दिवशीही पावसाने खोळंबा घातला, तर दुसऱ्याही दिवशी पावसानेच फलंदाजी केली. पण आता तिसऱ्याही दिवशी पाऊस खोळंबा घालणार का? हवामान अंदाज काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.

रविवारी (29 सप्टेंबर) म्हणजे कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही कानपूरमध्ये ढगाळ आकाश आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेदर रिपोर्टनुसार, रविवारी कानपूरमध्ये पावसाची 61 टक्के शक्यता आहे. रिमझिम पावसाचाही अंदाज आहे. शनिवारी संध्याकाळपासून रविवारी सकाळपर्यंत कानपूरमध्ये वादळांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी सकाळच्या अंदाजानुसार, सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 दरम्यान पाऊस पडू शकतो, त्यानंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा हवामानाचा अंदाज भीतीदायक आहे.

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला होता. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झाली नाही.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11- भारत- यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश- शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास(यष्टीरक्षक), मेहंदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.

महत्त्वाच्या बातम्या-

जय शहांनी उघडला पेटारा! आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना आता प्रति सामना मिळणार ‘इतकी’ फीस
“आकाश दीपने मोहम्मद शमीचा आदर्श घ्यावा”, भारतीय दिग्गजाचा कामाचा सल्ला
147 वर्षात कोणाला जमलं नाही, ते ‘या’ भारतीय खेळाडूने करून दाखवलं!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---