केवळ ते ६ शब्द जर ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्हणाला नसता तर कदाचीत तोही काल माजी कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेविड वार्नर आणि कॅमराॅन ब्रॅनक्राॅफ्टबरोबर विमान पकडून घरी परतला आसता. ते ६ शब्द होते “What the f*** is going on?”
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून चेंडू छेडछाडीचे धक्कादायक प्रकरण घडले.त्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये असलेला डॅरेन लेहमन हे शब्द म्हणताना दिसला.
या सामन्यात १२ वा खेळाडू म्हणून पीटर हॅन्डकाॅंब जबाबदारी पार पाडत होता. यावेळी लेहमनने वाॅकी टाॅकीवर एक संदेश दिला होता जो त्याने मैदानावर असलेल्या कॅमराॅन ब्रॅनक्राॅफ्टसाठी होता.
याबद्दलचा खुलासा क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलॅंड यांनी केला आहे.
“जेव्हा चहापानाचा ब्रेक झाला तेव्हा लेहमन सर्वांना विचारत होता की नक्की काय झाले? यात कोण कोण सहभागी आहे. “असे सदरलॅंड म्हणाले.
https://twitter.com/Meersy/status/977570719554064384