श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीग 2023 हंगामाची सुरुवात रविवारी (30 जुलै) झाली. सोमवारी (31 जुलै) गॅले टायटन्स आणि डंबुला ऑरा यांच्यात लीगचा दुसरा सामना खेळला गेला. कोलंबो येथे खेळला जाणारा हा सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. सामना थांबवण्याचे कारण देखील नवीन म्हणता येईल. कारण लाईव्ह सामन्यादरम्यान साप मैदानात आल्यामुळे सामना थांबवला गेला होता.
कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात गॅले टायटन्सने प्रथम फलंदाजी केली. तर डंबुला ऑरा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गॅले संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 5 बाद 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात डंबुला संघ फलंदाजीला आल्यानंतर मैदानात सापाची एंट्री झाली. खेळाडूंसह सामना पाहण्यासाठी आलेले चाहते आणि क्रिकेटच्या जाणकारांसाठी ही घटना नवीन होती आणि याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माहितीनुसार 2007 साली इंग्लंड संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना देखील अशाच प्रकारे लाईव्ह सामन्यात साप मैदानात आल्यामुळे सामना थांबवावा लागला होता. विशेष म्हणझे इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना देखील कोलंबोमध्येच खेळला गेला होता. या सापाची लांबी जास्त असल्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, पंचांच्या मनात या सापाविषयी भीती नव्हती. पंचांनी हा साप मैदानाबाहेर काढला.
The snake invaded the field and stopped play in the Lanka Premier League. pic.twitter.com/YJJxG5XV8V
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 31, 2023
डंबल ऑरच्या डावातील चौथ्या षटकानंतर अचानक मैदानात साप आल्याने खेळाडूंचीही चांगलीच चिंता वाढली. चौथ्या षटकात विश्वा फर्नांडो गलंदाजी करत होता. समोर कुलस मेंडीस आणि धनंजया डी सिल्बा फलंदाजीसाटी उपस्थित होते. मात्र सापामुळे सामन्याला काही मिनिटांचा उशीर झाला. (The snake invaded the field and stopped play in the Lanka Premier League)
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील शेवटच्या दिवशी ब्रॉड पुन्हा करणार ‘हे’ काम! शेअर केली भावूक पोस्ट
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच






