क्रिकेटचा आत्तापर्यंतचा इतिहास मोठा आहे. आजपर्यंत क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडू एकमेकांचे नातेवाईक असल्याचे आढळून येते. कधी दोन भावंड, कधी वडील-मुलगा, कधी काका-पुतणे अशा अनेक जोड्या आजपर्यंत क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. भारतीय क्रिकेटमध्येही काही वडील-मुलाच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. यामध्ये लाला अमरनाथ-मोहिंदर अमरनाथ, सुरिंदर अमरनाथ, सुनील गावसकर-रोहन गावसकर, रॉजर बिन्नी-स्टुअर्ट बिन्नी अशी काही उदाहरणे आहेत.
तसेच आत्ताही असे काही भारतीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल टाकत भविष्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करु शकतील. अशाच ३ पिता-पुत्रांबद्दल या लेखातून जाणून घेऊ.
1) सचिन तेंडुलकर-अर्जुन तेंडूलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम बनवले आहेत. त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील क्रिकेटपटू आहे. अर्जुन तेंडुलकरला सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने संघामध्ये सहभागी करून घेतले आहे. जर येणाऱ्या काळात अर्जुन तेंडुलकरने आपली आक्रमक गोलंदाजी दाखवली. तर तो भारतीय संघामध्ये स्थान मिळवू शकतो.
2) संजय बांगर-आर्यन बांगर
माजी क्रिकेटपटू संजय बांगर भारतीय संघासाठी 12 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. परंतु, ते प्रशिक्षक भूमिकेत खूप यशस्वी ठरले आहेत. त्यांचे चिरंजीव आर्यन बांगरने काही दिवसांपूर्वी कूच बिहार ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली होती. आर्यन हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे इंग्लंड काउंटीच्या ज्युनियर संघ लिसेस्टरशायरकडून खेळण्याबाबतही चर्चा झाली. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे नाही ठरणार की, तो देखील अगामी काळात भारतीय संघामध्ये आपले स्थान मिळवू शकतो.
3) राहुल द्रविड-समित द्रविड
भारतीय संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांना ‘द वॉल’ या नावाने ओळखले जाते. त्यांनी भारतीय संघासोबत उत्कृष्ट प्रदर्शन करून अनेक लोकांच्या मनामध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर अजून ही त्यांच्या चाहत्यांना आणखी त्यांना मैदानावर पहाण्याची इच्छा असते. आता त्यांचा मुलगा क्रिकेटमध्ये नाव मिळवू पाहात आहे. शालेय स्तरावर समितने अनेकदा त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
साल 2019 मध्ये कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आयोजित स्पर्धेमध्ये समितने 201 धावा केल्या आणि त्यानंतरच्या डावात 94 धावांवर नाबाद राहिला होता. इतकेच नव्हे तर समितीने गोलंदाजी करत 26 धावा देत तीन बळी देखील घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विश्वास आहे मी चांगल्या स्थितीत असेल’, कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी ट्रेंट बोल्ट सज्ज
शाकिब अल हसनच्या बचावासाठी पत्नी आली पुढे; म्हणाली, ‘त्याला खलनायकाच्या रुपात दाखवले जात आहे’
धक्कादायक! युरो २०२० स्पर्धेतील सामना सुरु असताना अचानक कोसळला ‘ख्रिस्टीयन एरिक्सन’, पाहा व्हिडिओ