महिला आशिया चषक (Asia Cup) 2022च्या अंतिम सामन्यात शनिवारी (15 ऑक्टोबर) भारत आणि श्रीलंका आमने-सामने आले. बांगलादेशच्या सिल्हेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापटटू हीचा हा निर्णय चुकल्याचे दिसले कारण त्यांनी 20 षटकात 9 विकेट्स गमावत केवळ 65 धावसंख्या उभारली.
या सामन्यातही भारतीय गोलंदाजंनी त्यांचा तुफानी फॉर्म कायम राखत श्रीलंकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकूच दिले नाही.तसचे भारताचे क्षेत्ररक्षणही जबरदस्त होते, कारण श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना भारताने धावबाद केले. अट्टापट्टू 6 धावा आणि अनुष्का संजीवनी 2 धावा करत तंबूत परतल्या. त्यानंतर रेणुका सिंग, दीप्ति शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी त्यांचे फलंदाजी करणे कठीण केले. चौथ्या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूत श्रीलंकेने तीन विकेट्स गमावल्या त्यामुळे 10 षटके झाली असता श्रीलंका 7 विकेट्स गमावत 26 धावांवर होता.
Renuka Thakur is on a roll here in Sylhet! 👏 👏
She picks her 3⃣rd wicket. 👍 👍
Sri Lanka FIVE down for 16.
Follow the match ▶️ https://t.co/r5q0NTVLQC #TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvSL
📸 Courtesy: Asian Cricket Council pic.twitter.com/dZikpKMnyy
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
श्रीलंका लवकरच सर्वबाद होणार अशी चिन्हे दिसत असताना तळातील खेळाडूंनी त्यांचा लढा सुरू ठेवला. श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा ओशादी रणसिंगे (13) आणि आयनोका रणवीरा ( नाबाद18) यांनीच केल्या. तसेच त्यांचे दोन फलंदाज शून्यावर बाद झाले.
भारतीय गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. यावेळी रेणुकाने 3 षटकात 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात दीप्ति शर्माला विकेट्स जरी मिळाल्या नसल्या तरी तिने 4 षटकात 7 धावा दिल्या.
Innings Break!
Outstanding bowling display from #TeamIndia! 👏 👏
3⃣ wickets for Renuka Thakur
2⃣ wickets each for @SnehRana15 & Rajeshwari GayakwadOur chase coming up shortly. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/r5q0NTVLQC #AsiaCup2022 | #INDvSL pic.twitter.com/LYj2VQX4wh
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
भारताचे फलंदाज शफाली वर्मा आणि जेमीमा रोड्रिग्ज या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तसेच्या संघात स्म्रीती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर देखील असल्याने भारताची फलंदाजी मजबूत आहे. भारत टी20 प्रकारमध्ये श्रीलंकेला नेहमीच वरचढ ठरला आहे. या सामन्यातही ते त्याची पुनरावृत्ती करतील याची अपेक्षा चाहत्यांना आहे.
भारताने 6 वेळा आशिया चषक जिंकला आहे, तर श्रीलंका एकदाही आशिया चषकाचा मानकरी ठरला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशने टी20 विश्वचषकाच्या संघात केला बदल, मुख्य संघातील ‘या’ दोन खेळाडूंची थेट घरी पाठवणी!
हे भयंकर घडले! विराटच्या चाहत्याने केली रोहितच्या चाहत्याची निर्घृण हत्या; वाचा संपूर्ण प्रकरण