2025 मध्ये क्रिकेट चाहत्यांना अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंसोबतच जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांनीही आपली छाप सोडली.
शुबमन गिल (754 धावा): इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत गिलने धावांचा पाऊस पाडला. त्याने एकाच मालिकेत 754 धावा केल्या, ज्यात 269 धावांच्या द्विशतकाचा समावेश आहे. भारतीय कर्णधार म्हणून एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने केला.
मिचेल स्टार्क (51 विकेट्स): ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) या वर्षी 50 कसोटी बळींचा टप्पा ओलांडला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि ॲशेस मालिकेत त्याने आपल्या गोलंदाजीने दहशत निर्माण केली होती.
रवींद्र जडेजा (764 धावा आणि 25 विकेट्स): जगातील नंबर 1 अष्टपैलू असल्याचे जडेजाने पुन्हा सिद्ध केले. या वर्षात त्याने फलंदाजीमध्ये 764 धावा केल्या आणि चेंडूने 25 विकेट्स घेतल्या.
आकाश दीप (10 विकेट्स, एजबॅस्टन कसोटी) इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत आकाश दीपला (Aakash Deep) आपला ड्रीम स्पेल मिळाला. त्याने एकाच सामन्यात 10 विकेट्स घेतल्या.
मोहम्मद सिराज (9 विकेट्स, ओव्हल कसोटी) इंग्लंड दौऱ्यात सिराजने आपल्या स्विंग आणि वेगाने इंग्लिश फलंदाजांना नाचवले. ओव्हलच्या मैदानावर त्याने 9 विकेट्स घेतल्या.
जो रूट (790 धावा): इंग्लंडच्या जो रूटने (Jo Root) आपली सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवली. 790 धावांसह तो आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये नंबर 1 वर राहिला.
ऋषभ पंत (26 षटकार): आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंतने या वर्षी 7 कसोटी सामन्यात सर्वाधिक 26 षटकार ठोकण्याचा विक्रम केला.
सायमन हार्मर (17 विकेट्स): दक्षिण आफ्रिकेच्या या गोलंदाजाने भारताविरुद्धच्या मालिकेत कोलकाता कसोटीसह केवळ 2 सामन्यात 17 विकेट्स घेण्याची मोठी कामगिरी केली.
एडन मार्करम (एका सामन्यात 9 कॅच): मार्करमने फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही इतिहास रचला. एकाच कसोटी सामन्यात 9 झेल पकडून त्याने जागतिक विक्रम केला.
केएल राहुल (813 धावा): केएल राहुलसाठी 2025 हे वर्ष फलंदाजीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरले. त्याने 3 शतकांच्या मदतीने एकूण 813 धावा केल्या.






