लाईव्हा क्रिकेट सामन्यात बऱ्याचदा अनपेक्षित अशा घटना घडत असताना. मात्र इंग्लंडच्या मैदानावर सामना सुरू असताना चक्क एक चोर क्रिकेटच्या मैदानात घुसून खेळाडूंच्या पर्समधून पैसे चोरी करू लागला. इंग्लंडमधील चेरवेल लीग क्रिकेट सामन्यादरम्यान ही घटना घडली. यावेळी स्टॅनटन हार्कोर्ट क्रिकेट क्लब आणि वोल्व्हरकोट क्लब यांच्यात सामना खेळला जात होता.
याचदरम्यान या चोराने मैदानाच्या आत असलेल्या खेळाडूंचे सामान पाहण्यास सुरुवात केली. त्याने खेळाडूंच्या पाकिटातून पैसे चोरी केले होते. ही सर्व माहिती क्रिकेट मैदानावर सामना खेळत असलेल्या खेळाडूंपर्यंत पोहचल्यावर त्यांनी चोराचा शोध घेण्यास सुरू केले.
याचदरम्यान खेळाडूंना मैदानावर एक संशयास्पद व्यक्ती एका बाकड्यावर बसलेला दिसून आला. यानंतर सर्व खेळाडू त्या बसलेल्या व्यक्तीकडे गेले आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली. जशी खेळाडूंनी चौकशी सुरू केली तो व्यक्ती घाबरला आणि तो तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले.
त्या संशयित व्यक्तीला पळताना पाहून खेळाडूंनी देखील त्याच्या मागे धावायला सुरुवात केली. खूप प्रयत्नानंतर खेळाडूंना त्या संशयित व्यक्तीला पकडण्यात यश आले. स्टॅंटन हार्कोर्ट क्रिकेट क्लबचा कर्णधार रायन वेस्टिएने याबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की, “वॉल्व्हरकोटमधील एका खेळाडूचे शरीर खूपच चांगले आणि धष्टपुष्ट असे होते. यापूर्वी या खेळाडूने बाउन्सर म्हणूनही काम केले होते. पोलिस येईपर्यंत त्या खेळाडूनेच त्या चोरट्याला स्वतःच्या ताब्यात घेतले होते. पोलिस आल्यानंतर आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा इंग्लंडच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात स्टॅंटन हार्कोर्ट क्रिकेट क्लबच्या संघाने वॉल्व्हरकोट संघातील ६ गडी बाद केले होते. तर वोल्व्हरकोट संघाची एकूण धावसंख्या ९३ होती. परंतु हा सर्व प्रकार घडल्याने सामना रद्द करण्यात आला. याबद्दल कर्णधार वेस्टीए म्हणाला की, “हा खेळ रद्द केल्यामुळे खूपच वाईट वाटले. पण त्यावेळी जे योग्य होते ते आम्ही केले. आम्ही त्या चोराला सोडू शकत नव्हतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘द हंड्रेड’ लीगमध्ये भारताच्या जेमिमाचा जलवा कायम, अवघ्या १० चेंडूत चोपल्या ४० धावा
Video: श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला टी२० पदार्पणात आपल्या आदर्श खेळाडूकडून मिळाले ‘स्पेशल गिफ्ट’
क्षेत्ररक्षणाची व्याख्याच बदलणारा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक; एकाच सामन्यात घेतले होते ५ झेल