सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता उभय संघांमधील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संघ (14 डिसेंबर) पासून गाबा येथे आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी क्युरेटरने खेळपट्टीबाबत मोठा दावा केला होता.
ऑस्ट्रेलियन वेबसाइट क्रिकेट डाॅट काॅम डाॅट एयू (cricket.com.au,) शनिवार (14 डिसेंबर) पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या अगोदर, गाबा क्युरेटर डेव्हिड सँडरस्कीच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, वर्षातील वेगवेगळ्या वेळा गाबा खेळपट्टी नक्कीच वेगळी बनवतात. यावेळी थोडी वेगळी खेळपट्टी असू शकते. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, हंगामाच्या शेवटी खेळपट्ट्या खराब होऊ शकतात, हंगामाच्या सुरुवातीला खेळपट्ट्या सामान्यतः थोड्या नवीन असतात. त्यांचा वेग आणि उसळी थोडा जास्त असतो.
क्युरेटर सँडर्स्की यांनी अहवालात म्हटले आहे की, “आम्ही साधारणपणे प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने खेळपट्टी तयार करतो, त्यामुळे आम्हाला चांगला वेग आणि बाउन्स मिळू शकतो, ज्यासाठी गाब्बा ओळखला जातो,” गेल्या महिन्यात या मैदानावर खेळल्या गेलेल्या घरच्या सामन्यात पहिल्याच दिवशी 15 विकेट्स पडल्या होत्या. याबाबत सँडुर्स्की म्हणाला, “आमचे ध्येय आहे की, अशाच प्रकारची विकेट तयार करणे, जिथे बॅट आणि बॉलमध्ये चांगले संतुलन होते. आशा आहे की त्यात प्रत्येकासाठी काहीतरी असेल.”
भारताने गेल्या दौऱ्यात गाबा कसोटीत शानदार विजय मिळवला होता. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) शानदार खेळीच्या जोरावर भारताने गाबा येथे ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली. 1988 नंतर यजमान संघाचा या मैदानावरील हा पहिलाच पराभव होता. मात्र, भारतापाठोपाठ वेस्ट इंडिजनेही ऑस्ट्रेलियाला गाबामध्ये पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मृती मंधानाच्या शतकानंतरही भारताच्या हाती निराशा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा व्हाईटवॉश
हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी, संघाची उपांत्य फेरीत धडक; मोहम्मद शमीनेही मोठा विक्रम केला!
जसप्रीत बुमराहच्या हाती निराशा, पाकिस्तानी खेळाडूनं जिंकला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार