पाकिस्तान देशात आंतरराष्ट्रीय स्थरावरील क्रिकेट परतण्यासाठी आयसीसी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून इंडिपेडन्स कप पाकिस्तानात आयोजित करण्यात आला आहे. यात पाकिस्तान संघाविरुद्ध वर्ल्ड ११ असे सामने होणार आहे.
पाकिस्तानमध्ये लाहोर शहरात १२, १३ आणि १५ सप्टेंबर रोजी ही मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला £७५,००० मिळणार आहे. या मालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. संघाला मिलिटरीचे मोठे संरक्षण असणार आहे.
या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीकडे देण्यात आले आहेत. याशिवाय हाशिम अमला, पॉल कॉलिंगवूड, तमाम इक्बाल, इम्रान ताहीर हेही खेळाडू खेळणार आहेत.
वर्ल्ड ११ संपूर्ण संघ:
फाफ डुप्लेसी, सॅम्युएल बद्री, जॉर्ज बेली, हाशिम अमला, पॉल कॉलिंगवूड, तमाम इक्बाल, इम्रान ताहीर, बेन कटिंग, ग्रॅण्ट एलियट, डेविड मिलर, मोर्ने मॉर्केल, टीम पेन, थिसारा परेरा, डॅरेन सॅमी