आतापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये अनेक धावा केल्या आहेत. बऱ्याचदा फलंदाजांनी फॉर्ममध्ये असताना उत्तम खेळी करत शतकेही ठोकली आहेत. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत वनडेत मोठ्या खेळी केल्या आहेत. जिथे शतकही कठीण वाटत होते, तिथे आता खेळाडूंनी दिडशतके-द्विशतके करण्यापर्यंत मजल मारली आहे.
तसेच फारच क्वचितच असे घडते की कोणत्याही फलंदाजाचा फॉर्म पूर्ण वर्षभर टिकून राहतो आणि तो सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करतो. वर्षभर सातत्याने धावा करणे हे सोपे काम नाही, परंतु काही भारतीय खेळाडूंनी तसे केले आहे. असे अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी वर्षभर जबरदस्त फलंदाजी केली. या लेखातही आपण त्या ३ भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना एका वर्षात सर्वाधिक वनडे शतके केली आहे.
एका वर्षात सर्वाधिक वनडे शतके ठोकणारे ३ भारतीय खेळाडू –
३. सौरव गांगुली – ७ शतके, २००० साली
या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली तिसर्या क्रमांकावर आहे. सौरव गांगुली हा केवळ एक जबरदस्त कर्णधार नव्हता तर डावखुरा उत्कृष्ट फलंदाजही होता. तो जगातील महान खेळाडूंमध्ये गणला जातो. २००० मध्ये म्हणजे एकूण वर्षभरात सौरव गांगुलीने ३२ वनडे सामने खेळून ५६.३९ च्या सरासरीने १५७९ धावा केल्या होत्या. या दरम्यान सौरव गांगुलीने ७ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली होती.
२. रोहित शर्मा – ७ शतके, २०१९ साली
भारतीय वनडे क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा, एका वर्षात सर्वाधिक वनडे शतके ठोकणार्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसर्या स्थानावर आहे. २०१९ हे वर्ष रोहित शर्मासाठी सर्वात अविस्मरणीय होते आणि त्याने या वर्षभरात आपल्या बॅटने बऱ्याच धावा केल्या.
२०१९ च्या विश्वचषकातच रोहित शर्माने ५ शतके ठोकली, हा एक विश्वविक्रम आहे. रोहित शर्माने २०१९ मध्ये एकूण २८ वनडे सामने खेळले आणि २७ डावात ५७.३० च्या सरासरीने १४९० धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ शतके केली आणि ६ अर्धशतकेही केली.
१. सचिन तेंडुलकर – ९ शतके, १९९८ साली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका वर्षात सर्वाधिक वनडे शतके ठोकण्याच्या बाबतीत, केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगामध्ये आघाडीवर आहे. आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर असून, एका वर्षात सर्वाधिक वनडे शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
१९९८ मध्ये सचिन तेंडुलकर जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि त्यावर्षी त्याने बऱ्याच धावा काढल्या. १९९८ मध्ये ३४ वनडे सामन्यात ६५.३१ च्या सरासरीने सचिनने १८९४ धावा केल्या. त्यावेळी सचिनने सर्वाधिक ९ शतके केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टुअर्ट बिन्नीने ‘तो’ मोठा विक्रम मोडल्यानंतर अनिल कुंबळेनी पाठवला होता ‘हा’ खास संदेश
‘घराणेशाही’च्या आरोपामुळे त्रस्त होता हा पाकिस्तानचा खेळाडू; बाथरूममध्ये रडायचा तासंतास
भारताचा हा युवा खेळाडू कमावतोय आफ्रिदीच्या तुलनेत आयपीएलमध्ये ३ पटीने अधिक रूपये
ट्रेंडिंग लेख-
–आयपीएल २०२० चे सामने होऊ शकतात युएईच्या या ३ मैदानांवर
आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ….
निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू






