वेस्ट इंडीजमध्ये खेळला जात असलेला १९ वर्षाखालील विश्वचषक (u19 world cup 2022) अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात स्वतःचे स्थान बनवले आहे. अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत काही युवा खेळाडू असे होते, ज्यांनी खूपच अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले. काही गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून संघाच्या कामगिरीत मोलाचे योगदान दिले. आपण या लेखात अशाच पाच गोलंदाजांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
१. दुनिथ वेलालागे (श्रीलंका) – १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक श्रीलंकाचा फिरकी गोलंदाज दुनिथ वेलालागे याचा येतो. श्रीलंका संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही, पण दुनिथने स्पर्धेत खेळलेल्या पाच सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. या पाच सामन्यात त्याने १७ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याची सरासरी ९.३५ होती, तर इकोनॉमी ३.५३ होती.
२. आवेश अली (पाकिस्तान) – सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या आवेश अलीने स्थान बनवले आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याची सरासरी १४.७१ होती, तर इकोनॉमी ५.०६ होती. यामध्ये त्याच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने ५६ धावा खर्च करून तब्बल ६ विकेट्स नावावर केल्या होत्या.
३. जोशुआ बॉयडेन (इंग्लंड) – विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या १९ वर्षाखालील इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोशुआ बॉयडेन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानेही पाच सामने खेळले आहेत आणि यामध्ये १३ विकेट्स नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ९.५३ होती, तर इकोनॉमी ३.१७ होती. विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने १६ धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या होत्या.
४. जुमा मियाजी (युगांडा) – १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत युगांडा संघ सर्वात कमजोर ठरला. परंतु त्यांच्या एका गोलंदाजाने सर्वोत्तम ५ गोलंदाजांच्या यादीत जागा मिळवली आहे. या गोलंदाजाचे नाव आहे जुमा मियाजी. मियाजीने खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या. या विकेट्स त्याने १७.७६ ची सरासरी आणि ५.१३ च्या इकोनॉमीने घेतल्या आहेत.
५. रेहान अहमद (इंग्लंड) – १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा रेहान अहमद आहे. त्याने फक्त तीन सामन्यात इंग्लंडने प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये १२ विकेट्स घेतल्या. त्याने यूएई, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांच्या प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“मला नाही वाटत वेंकटेश अय्यर अधिक यशस्वी होईल..” माजी भारतीय क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रीया
इंग्लंड क्रिकेटमध्ये वादळ! ऍशेस मालिकेतील पराभवानंतर ‘या’ सदस्याने दिला राजीनामा
ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या उपकर्णधार शेख राशिदची प्रेरणादायी कहाणी