भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून खटके उडताना दिसले आहेत. आशिया चषक 2023 या मुद्यावरून बीसीसीआय आणि पीसीबी अनेकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. पण अखेर हा वाद आता कुठेतरी मिटताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार आशिया चषक 2023 पाकिस्तानमध्ये आयोजित होणार आहे. पण भारतीय संघाचे सामने मात्र पाकिस्तानबाहेर आयोजित केले जातील.
इएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) ठरल्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. फरक फक्त इतकाच असेल की, भारतीय संघ आपल्या अटीवर कायम असल्याने, भारताचे सामने पाकिस्तानच्या बाहेर आयोजित केले जातील. भारतीय संघाला यावर्षीच्या आशिया चषकात पाच सामने खेळायचे असून यात किमान दोन सामने पाकिस्तानसोबत असतील. अशात या पाचही सामन्यांसाठी आशियाई क्रिकेट परिषय (ACC) या पाच सामन्यांचे आयोजित पाकिस्तानबाहेर करणार असल्याचे सांगितले जात आहे. हे सामने पाकिस्तानच्या बाहेर होणास असल्याचे सांगितले जात असले, तरी या सामन्यांचे निश्चित स्थन अद्याप ठरले नाहीये. इंग्लंड, ओमान, श्रीलंका आणि यूएई याठिकाणी एसीसी भारताचे सामने आयोजित करेल, असे सांगितले जात आहे. याविषयी कुठलीच ठोस माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाहीये.
भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) आगामी आशिया चषकात एका गटात असणार आहेत. भारत-पाकिस्तान आणि त्याच्यासोबत आशिया चषकासाठी पात्र ठरणारा सहावा संग या गटात असेल. तसेच दुसरा गट हा श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा आहे. या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये ही स्पर्धा आयोजित होणार आहे. एकूण 13 दिवस ही स्पर्धा चालणार असून अंतिम सामन्यासह 13 सामने खेळवले जातील.
दरम्यान, आशिया चषकाचा हा संपूर्ण वाद बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या एका विधानानंतर सुरू झाला. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जस शहांनी म्हटल्याप्रमाणे आगामी आशिया चषक हा न्यूट्रल वेन्यूवर खेळवला जाईल. शहांच्या या विधानानंतर तेव्हाचे पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांना देखील बीसीसीआयला थेट धमकीच देऊन टाकली. भारत आशिया चषाकासाठी पाकिस्तानमध्ये येणार नाही, तर पाकिस्तान देखील आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही, असे राजा म्हणाले होते. पण नंतर राजा आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आले आणि काही कारणास्तव त्यांना पीसीबीचे अध्यक्षपद सोडावे लागले. सध्या पीसीबीच अध्यक्षपद नजम सेठींच्या हातात आहे. काही दिवसांपूर्वी सेठिंनी आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयसोबत बैठक देखील बोलावली होती.
(The upcoming Asia Cup will be held in Pakistan. But India’s matches will be played outside Pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केकेआरच्या कर्णधारपदासाठी हे तीन खेळाडून प्रमुख दावेदार, अय्यरच्या दुखापतीनंतर संघ लवकरच घेणार निर्णय
हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात! ‘या’ वादळी फलंदाजाने ठोकला दावा