ऍशेस 2023चा दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 248 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघ 138 धावांनी मागे आहे. सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाचा मध्यक्रमातील फलंदाज मार्नस लाबुशेन याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत लाबुशेन जमिनीवर पडलेले च्विंगम पुन्हा उचलून तोंडात टाकताना दिसला.
ऍशेस 2023च्या या दुसऱ्या सामन्यात लाबुशेनचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवसी ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करताना हा प्रकार पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 44-45व्या षटकादरम्यान मोकळ्या वेळेत मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) जमिनीवरील च्विंगम उचलून तोंडात टाकताना दिसला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 178 धावा होती. लाबुशेन त्यावेळी 40, तर स्टीव स्मिथ (Steve Smith) 37 धावांसह खेळपट्टीवर होते. व्हायरल व्हिडिओत दिसते की, लाबुशेनने एका हातातील ग्लव्ज काढले आहेत आणि त्याच हाताने खाली पडलेले च्विंगम तो उचलतो. नेटकरी या व्हिडिओमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजाला चांगलेच ट्रोल करत आहेत.
five second rule ft marnus labuschagne pic.twitter.com/KUWkECFizN
— Sritama (@cricketpun_duh) June 29, 2023
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात लाबुशेनने 93 चेंडूत 47 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. एकूण 100.4 षटके खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 416 धावा करून सर्वबाद झाला. स्टीव स्मिथ याने 184 चेंडूत 110 धावा केल्या. ट्रेविस हेड याने 73 चेंडूत 77 धावा, तर सलामीवीर डेविड वॉर्नरने 88 चेंडूत 66 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी ओली रॉबिन्सन आणि जोश टंग यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या अनुभवी जोडीला पहिल्या डावात प्रत्येकी एक-एक विकेटवर समाधान मानावे लागले. फिरकी गोलंदाजी करणाऱ्या जो रुट यालाही दोन विकेट्स मिळाल्या.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघ फलंदाजील आल्यानंतर सलामीवीर झॅक क्राउली आणि बेन डकेत यायंनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. डकेथने134 चेंडूत वैयक्तिक 98 धावा केल्या. (The video of Marnal Labuschagne’s embarrassing act during the Lord’s Test is going viral)
महत्वाच्या बातम्या –
‘विराट गाजवणार 2023चा World Cup’, विंडीजच्या दिग्गजाची भविष्यवाणी, भारताबद्दल म्हणाला…
‘विराट गाजवणार 2023चा World Cup’, विंडीजच्या दिग्गजाची भविष्यवाणी, भारताबद्दल म्हणाला…