आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup)चा विजेता संघ इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात डेविड मलान याच्या शतकी खेळीवर डेविड वॉनर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या खेळ्या भारी पडली. स्मिथने 78 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या आणि षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान त्याने वॉर्नरला असे काही बोलले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
ऍडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने त्याच्या खेळीत 9 चौकार आणि एक षटकार खेचला. दुसरीकडे डेविड वॉर्नर (David Warner) यानेदेखील 84 चेंडूत 86 धावा केल्या. जेव्हा स्मिथ आणि वॉर्नर क्रीझवर होते तेव्हा स्मिथ वॉर्नरकडे गेला आणि म्हणाला, ‘आय एम बॅक बेबी’. त्या दोघांच्या या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या सामन्यात स्मिथ-वॉर्नर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली.
I'm back, baby! #AUSvENG pic.twitter.com/7pLXABkUQy
— cricket.com.au (@cricketcomau) November 17, 2022
सामन्यात पाहिले जर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून डेविड मलान याने 128 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकाराच्या सहाय्याने 134 धावा केल्या. यामुळे इंग्लंडने 50 षटकात 9 विकेट्स गमावत 287 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 46.5 षटकातच पूर्ण केले. वॉर्नर-स्मिथबरोबर ट्रेविस हेड याने 57 चेंडूत 69 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने सामना जिंकत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
टी20 विश्वचषकाआधी या दोन्ही संघात तीन सामन्यांची टी20 मालिका झाली. ज्यामध्ये इंग्लंड 2-0ने जिंकला आणि तिसऱ्या सामन्याचा निकालच लागला नाही. हे दोन्ही सामने इंग्लंडने 8-8 धावांनी जिंकले होते. तसेच या दोन्ही संघातील दुसरा वनडे सामना 19 नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. The video of Steve Smith’s and David Warner on the field is going viral, AUSvENG 1st ODI
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांना न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजापासून सावध राहावं लागणार! प्रत्येक 11 व्या चेंडूला घेतो विकेट
एमएस धोनीचा क्रिकेटनंतर टेनिस कोर्टवर जलवा, ‘या’ चॅम्पियनशिपमध्ये जिंकले दुहेरीचे विजेतेपद