---Advertisement---

तुझं वजन जरा २० ते २५ किलो जास्तच! वेडचे पंतला मजेदार स्लेजिंग, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 5:46 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा दबदबा बघायला मिळतोय. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेडने झुंजार 40 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान रिषभ पंत आणि त्याच्यामध्ये बराच वेळ स्लेजिंग बघायला मिळाली.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावामधील 25 वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला होता. यावेळी वेड स्ट्राइक वर असल्याने रिषभ पंत त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत होता. वेडने पहिला चेंडू खेळल्यानंतर पंत, वेडकडे बघून जोरात हसायला लागला. यावेळी वेड देखील पंतकडे बघून हसत म्हणाला, ‘तू स्वतःला मोठ्या स्क्रीनवर बघितलस का, तुझं वजन 20 ते 25 किलो जास्त आहे ‘.

वेड व पंत मधील या मजेशीर संभाषणामुळे मैदानावर तसेच समालोचन कक्षातही हशा पिकली होती. cricket.com.au ने देखील आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला होता. काही वेळातच ट्विटरवर हा व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

दरम्यान सामन्याचा विचार केला असता, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने 66 षटकात 6 गडी गमावत 133 धावा केल्या आहेत. कॅमरून ग्रीन 17 व पॅट कमिंस 15 धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 2 धावांची आघाडी आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अजबच आहे बाबा! बुमराहने स्टंपवरील बेल्स उडवल्या तरी स्मिथला तपास नाही, पाहा व्हिडिओ

कोहली-स्मिथच्या फलंदाजीला विसाव्या वर्षाचं ग्रहण; दोघांनीही केलाय ‘हा’ नकोसा विक्रम

दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकल्यावर विराटने दिली प्रतिक्रिया! पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---