---Advertisement---

श्रीलंकेचे प्रशिक्षक म्हणतात, ‘ही’ गोष्ट टीम इंडियाकडून शिकण्यासारखी

On: गुरूवार, जानेवारी 9, 2020 7:41 PM
---Advertisement---

इंदोर| मंगळवारी (7 जानेवारी) भारताने श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याच बरोबर मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर (Micky Arthur) यांनी भारतीय संघाची प्रशंसा केली आहे.

युवा खेळाडूंना कसे निवडतात आणि महत्त्वपूर्ण क्षणी त्यांच्यावर जबाबदारी कशाप्रकारे दिली जाते हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ भारताकडून शिकू शकतात, असे आर्थर यावेळी म्हणाले.

“हे पाहणे मजेदार राहील की भारतीय संघ युवा खेळाडूंना संधी देत आहेत. तसेच सामन्यातील महत्त्वपूर्ण क्षणी त्यांना संधी दिली जात आहे, हे खूप चांगले आहे. या खेळाडूंना खेळताना पाहणे शानदार आहे. मला असे वाटते की भारतीय क्रिकेट सध्या खूप चांगल्या स्थितीत आहे,” असे भारतीय संघाची प्रशंसा करताना आर्थर म्हणाले.

“तुम्ही केएल राहुलसारख्या खेळाडूला पहा, त्याने असे काही चांगले शॉट्स खेळले जे उत्कृष्ट होते,” असेही आर्थर यावेळी म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---