भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला उद्यापासून (22 जानेवारी) सुरूवात होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसेल. दोन्ही संघातील पहिला टी20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) एका वर्षानंतर पुनरागमन करताना दिसेल. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 आणि कोलकाता येथील हवामानाबद्दल जाणून घेऊया.
बुधवार (22 जानेवारी), रोजी भारत-इंग्लंडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की, या दिवशी पावसाची शक्यता नाही. बुधवारी कमाल तापमान 27 अंश आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश सूर्यप्रकाशित राहील, त्यामुळे पहिल्या टी20 सामन्यात कोणताही व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे.
ईडन गार्डन्सची खेळपट्टी सहसा फलंदाजीसाठी योग्य असते, त्यामुळे भारत-इंग्लंडमधील पहिला टी20 सामना उच्च धावसंख्या असलेला ठरू शकतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 टी20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 13 वेळा, तर इंग्लंडने 11 वेळा विजय मिळवला आहे.
पहिल्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग 11- फिल साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बॅथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11- संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या-
स्वप्नवत कामगिरी! पदार्पणात हॅट्ट्रीक घेत 19 वर्षीय खेळाडूनं रचला इतिहास, भारताचा सहज विजय
याला म्हणतात ‘गंभीर’ परिणाम, विराट कोहली 12 तर रोहित शर्मा 10 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार
गिल नाही तर हा खेळाडू टीम इंडियाचा भावी कर्णधार, माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया