भारताच्या महिला क्रिकेट संघानं (India Women Cricket Team) शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. दक्षिण आफ्रिकेचा हा भारत दौरा होता. भारतानं या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आणि एकदिवसीय मालिका त्यांच्या नावावर केली. तत्पूर्वी यंदाच्या महिला टी20 आशिया कपचे वेळापत्रक मंगळवार (25 जून) रोजी जाहीर झालं आहे.
यंदाच्या पुरुष आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) पाकिस्तान विरुद्ध भारत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला धूळ चारली. परंतु आता यंदाच्या महिला टी20 आशिया कपचे (Women’s T20 Asia Cup) वेळापत्रकसुद्धा जाहीर झालं आहे आणि यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान हा महिलांचा सामना खूप रोमांचक पाहायला मिळणार आहे.
या महिला टी20 आशिया कपमध्ये (ICC Women’s T20 World Cup) एकूण 15 सामने खेळले जाणार आहेत. त्यामध्ये सेमीफायनल-1, सेमीफायनल-2 आणि फायनल सामना खेळला जाणार आहे. आयसीसी टी20 आशिया कप स्पर्धेला 19 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर 28 जुलैला फायनल सामना खेळला जाणार आहे. (19 जुलै) संध्याकाळी 7 वाजता दुसऱ्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तानची लढत होणार आहे.
महिला आशिया कपचे वेळापत्रक
19 जुलै- युएई विरुद्ध नेपाळ, दुपारी 2 वाजता
19 जुलै- भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी 7 वाजता
20 जुलै- मलाशिया विरुद्ध थायलंड, दुपारी 2 वाजता
20 जुलै- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, सायंकाळी 7 वाजता
21 जुलै- भारत विरुद्ध युएई, दुपारी 2 वाजता
21 जुलै- पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, सायंकाळी 7 वाजता
22 जुलै- श्रीलंका विरुद्ध मलाशिया, दुपारी 2 वाजता
22 जुलै- बांगलादेश विरुद्ध थायलंड, सायंकाळी 7 वाजता
23 जुलै- पाकिस्तान विरुद्ध युएई, दुपारी 2 वाजता
23 जुलै- भारत विरुद्ध नेपाळ, सायंकाळी 7 वाजता
24 जुलै- बांगलादेश विरुद्ध मलाशिया, दुपारी 2 वाजता
24 जुलै- श्रीलंका विरुद्ध थायलंड, सायंकाळी 7 वाजता
26 जुलै- सेमीफायनल-1, दुपारी 2 वाजता
26 जुलै- सेमीफायनल-2, सायंकाळी 7 वाजता
28 जुलै- फायनल, सायंकाळी 7 वाजता
या आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, युएई, नेपाळ ग्रुप-1 मध्ये आहेत. तर बांगलादेश, श्रीलंका, मलाशिया, थायलंड ग्रुप-2 मध्ये सहभागी आहेत. हे सर्व सामने दांबुला, श्रीलंका येथे खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या विदेशी मंत्र्याने राशिद खानला फोन करुन दिल्या शुभेच्छा..!
जखमेवर मीठ..! अफगाणिस्तानच्या खेळाडूने पोस्ट करुन ऑस्ट्रेलियाची उडवली खिल्ली!
सेमीफायनलमध्ये धडक मारल्यानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर चाहत्यांनी केला जल्लोष!






