---Advertisement---

WTC फायनलविषयी मोठा निर्णय! भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ चेंडूवर खेळणार

On: शुक्रवार, मे 19, 2023 8:06 PM
Pat Cummins Virat Kohli
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ 7 जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात आमने सामने असतील. भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूविना कसोटी सामना खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा हा दुसरा सामना असून ऑस्ट्रेलियन पद्धतीचा कुकाबूरा चेंडू यासाठी वापरला जाणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला आंतिम सामना 2021 साली खेळला गेला होता. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने होते. हा सामना ड्यूक छेंडूने खेळला गेला होता. मागच्या काही काळापासून काउंड क्रिकेटमधील संघ ड्यूक चेंडूची गुणवत्ता ढासळल्याची तक्रार करत आहेत. याच कारणास्तव यावर्षी खेळला जाणार डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना कुकाबूरा चेंडूने खेळला जाईल. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिने नुकतीच याविषयी प्रतिक्रिया दिली. पाँटिंगने सांगितले की, “डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात ड्यूक ऐवजी कुकाबूरा चेंडू वापरण्यास आयसीसीकडून परवानगी मिळाली आहे.”

भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यात होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्याविषयी आयसीसीच्या एका कार्यक्रमात पाँटिंग म्हणाला की, “ही भारतीय संघाची वरची फळी आणि वेगवान गोलंदाजी आक्रमण यांच्यात स्पर्धा असेल, असे मला वाटते. भारतीय फिरकी गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज यांच्यातील स्पर्धेविषयी आमन नेहमीच बोलतो. पण ओव्हल स्टेडियमची परिस्थिती पाहता, या गोष्टी जास्त महत्वाच्या ठरणार नाहीत.”

“मी याठिकाणी खेळल्यानंतर खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजीसाठी चांगली असते. खेळ जसजसा पुढे जाईल, याठिकाणी फिरकीपटूंना मदत मिळू लागते,” असेही पाँटिंग पुढे म्हणाला. दरम्यान, मागच्या वेळी भारतीय संघाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण यावेळी भारतीय संघ ही मानाची गदा उचावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रिषभ पंत असे काही महत्वाचे फलंदाज दुखापतग्रस्त आहेत. या खेळाडूंची कमी भारतीय संघाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात जाणवेल. (The WTC final between India and Australia will be played with a Kookaburra ball instead of Duke)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतकानंतर विराट कोहली ऑस्ट्रलियन गोलंदाजांच्या निशाण्यावर! डब्ल्यूटीसी फायनलआधी स्वतः रिकी पाँटिंगचा खुलासा
फाफ डू प्लेसिस विश्वचषकात खेळलाच पाहिजे! भारतीय दिग्गजाचा दक्षिण आफ्रिका बोर्डाला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---