इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची लोकप्रीयता भारतासह जगभारत आहे. दिवसेंदिवस आयपीएलचे महत्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही वाढत चालले आहेत. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटच्या तुलनेत लवकर राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाल्याचे अलिकडच्या काही वर्षात आपण पाहिले. आयपीएलचा हा झगमगाट पाहून भारताती एक युवा खेळाडू मात्र लाखो रुपयांच्या फसवणूकीला वळी पडला आहे.
उत्तर प्रदेशचा च्या लखनऊ शहरात राहणारा खेळाडू अभिलेख सिंग (Abhilekh Singh) याचे इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळण्याचे स्वप्न होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने सोपा मार्ग शोढला आणि याचाच फटका त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांना बसला आहे. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देतो, असे सांगून त्याला पाच लाख रुपयांची टोपी घातली गेली आहे. या फसवणुकीनंतर अभिलेखने गौतमपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याविषयी माहिती दिली गेली आहे.
लखनऊच्या स्पोर्ट्स कॉलेजमधून पासआउट झालेला अभिलेख पोलिसात दाखल केलल्या तक्रारीत सांगितले की, 2019 साली सिंग बाबू स्टेडियममध्ये एक सराव सामना खेळताना त्याची कृष्णा कुमार झा (Krishna Kumar Jha) नावाच्या या व्यक्तिशी भेट झाली होती. याच व्यक्तिने आता त्याची फसवणूक केली आहे. तक्रारीत सांगितल्याप्रमाणे कृष्णा कुमार झा याने अभिलेखला आयपीएलमध्यये खेळवण्याचे आमीष दाखवले आणि यासाठी 17 लाख रुपयांची मागणी देखील केली. अभिलेखने एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दर्शवल्यानंतर व्या व्यक्तिने त्याला राज्याच्या संघात संधी देतो म्हणत, पाच लाख रुपयांची मागणी केली. राज्याकडून खेळल्यानंतर आयपीएलमध्ये संधी देतो, असेही या व्यक्तिने अभिलेखला सांगितले होते. अभिलेखने आई-वडिलांकडून कसेबसे पैसे घेतले आणि चेकद्वारे या कृष्णा कुमार झा नामक व्यक्तिला दिले होते.
अभिलेखने दिलेल्या माहितीनुसार त्याला वाट पाहायाला सांगितले जात होते. त्याचे काही दिवस अरुणाचल प्रेदशमध्ये एक अतिरिक्त खेळाडू म्हणून संघाची साथ देखील दिली, पण त्याला संघात खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही, जो आयपीएल खेळण्यासाठी एक नियम आहे. खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे अभिलेखने आरोपीकडून त्याचे पैसे माघारी मागितले, पण याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी त्याला मिळाली. पोलीस अधिकारी आणि अभिकेळ सिंगने दिलेल्या माहितीनुसार या आरोपीविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली गेली आहे आणि तपास देखील सुरू आहे. आरोपीचा तपास लावण्यासाठी सायबर सेलची मदत घेतल्याचेही सांगितले गेले आहे. (The young player was lured to the IPL and robbed of five lakh rupees)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट झाला अलिबागकर! मि & मिसेस कोहलीचा नवा ‘आशियाना’ तब्बल इतक्या कोटींचा
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दाखवला आपल्या खेळाडूंना आरसा, म्हणाला, “रोहितकडून शिका”