भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून त्यात भारताने विजय मिळवला आहे. तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदोरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स व अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हे मायदेशी परतले आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पुनरागमनाची तयारी करत असतानाच, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी याने आपल्या संघाला एक सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या अपेक्षेने या मालिकेत सहभागी झाला होता. अनेक माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलिया संघाला या मालिकेत विजयाची संधी असल्याचे म्हटलेले. मात्र, प्रत्यक्ष सामन्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा दुबळा दिसून आला. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या सर्वच फलंदाजांनी अक्षरशः नाग्या टाकल्या. नागपूर व दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी भारतीय संघाने तीन दिवसात जिंकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत पूर्णतः अपयशी ठरल्यानंतर माईक हसी याने नुकताच संघाला एक सल्ला दिला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला,
“ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरी या दौऱ्यावर निराशाजनक राहिली. आपल्या फलंदाजांनी रोहित शर्माकडे पाहावे. त्याने पहिल्या दोन सामन्यात जशी फलंदाजी केली त्यातून भरपूर शिकण्यासारखे आहे.”
रोहितने या मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावले होते. त्याने आधी आक्रमण करत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, बचावाचे तंत्र अवलंबत संघाचा डाव पुढे नेलेला. दुसऱ्या सामन्यातील पहिला डावात तो फारशी मोठी धावसंख्या करू शकला नव्हता. मात्र, दुसऱ्या डावात संघाला पुन्हा एकदा त्याने आक्रमक सुरुवात देत 20 चेंडूवर 31 धावा करत संघाला सामन्यात पुढे नेले.
(Mike Hussy Advice Australia Team Look Rohit Sharma Batting In Border-Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शाळेतील पोरीची चूक’, म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच
कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा