क्राईस्टचर्च। उद्यापासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. तसेच त्याने म्हटले आहे की भारतीय संघ या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सक्षम आहे.
उद्यापासून सुरु होणारा कसोटी सामना 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून 1-0 अशी आधीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला या मालिकेतील पराभव टाळायचा असेल तर उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक असेल. तर न्यूझीलंडचा संघ दुसरा सामना जिंकून भारताला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी पत्रकारांशी बोलताना बोल्ट म्हणाला, ‘भारतीय संघ अव्वल क्रमांकाचा संघ आहे आणि ते कोणत्याही परिस्थिशी जुळवून घेऊ शकतात. या कसोटी सामन्यातही ते परिस्थितीशी जुळवून घेतील आणि सकारात्मकतेने खेळतील अशी आम्ही अपेक्षा ठेवली आहे. त्यांची(भारतीय संघाची) आकडेवारीच त्यांची क्षमता सिद्ध करते.’
बोल्टने पहिल्या कसोटी सामन्यातून न्यूझीलंड संघात दुखापतीनंतर शानदार पुनरागमन केले होते. त्याने चांगली कामगिरी करत 5 विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच आता दुसऱ्या कसोटीतही तो हेगली ओव्हलच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यास उत्सुक आहे.
बोल्ट म्हणाला, ‘मला आशा आहे की खेळपट्टीवर गवत असेल. इथे नेहमीच चांगली खेळपट्टी असते. इथे चेंडू वळतोही. मला वाटते मला इथे ढगाळ वातावरण असलेले आवडेल, जसे इथे नेहमीच असते. कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे नेहमीच आव्हानात्मक असते. हा सर्वात कठीण क्रिकेट प्रकार आहे.’
‘आम्हाला इथे गोलंदाजी करण्यास मजा येते. आम्ही भारताविरुद्ध इथे कसोटी सामना खेळण्यास उत्सुक आहोत. आम्हाला आम्ही काय करत आहोत, हे माहीत आहे आणि आम्ही यासाठी उत्सुक आहोत.’
विराट कोहलीला रोखण्यासाठी असा आहे न्यूझीलंडचा खास प्लॅन https://t.co/1kOm4b8nr5#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020
इशांत शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण https://t.co/6A3ZT3OeSD#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020