घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ ला सुरूवात होत आहे.
मुंबई उपनगर मधील ही एक नावाजलेली कबड्डी लीग आहे. आजी-माजी कबड्डीपटूच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कबड्डी लीग तिसऱ्या यशस्वी पर्वाकडे वाटचाल करीत आहे. शनिवार दिनांक १४ मार्च २०२० रोजी तिसऱ्या पर्वा साठी लिलाव पार पडला. त्याप्रसंगी घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश जंगम आणि सहपत्नी घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग च्या तिसऱ्या पर्वाचे थीम सॉंग रिलीज केलं.
घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ च्या थीम सॉंग ची संकल्पना घाटकोपर प्रतिष्ठानच्या श्री अभिषेक घाग यांची आहे. तर गाण्याची शब्द रचना श्री सचिन डांगळे यांनी केली आहे. हे गाणं श्री विवेक नाईक यांनी गायला आहे.
थीम सॉंग पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
https://youtu.be/VBwyK2lNfaY