देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचा माजी कर्णधार नितीश राणा आगामी हंगामात नव्या संघासाठी खेळताना दिसू शकतो. मागच्या काही दिवसांपासून दिल्ली संघ आणि नितीश राणामध्ये बिनसल्याचे बोलेल जात होते. अशातच आता माहीत मिळत आहे की, राणा देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामात दिल्ली ऐवजी उत्तर प्रदेश संघासाठी खेळताना दिसू शकतो. पण अद्यावर याबाबत कुठलीच अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh ) क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली की, नितीश राणा (Nitish Rana) आगामी हंगामात त्यांच्या संघासाठी खेळताना दिसू शकतो. अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, “नितीश राणा देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामात उत्तर प्रदेशसाठी खेळू शकतो. यासाठी आवश्यक असणारी औपचारिकता केली जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल.”
काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, नितीश राणा ध्रुव शौरी यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट परिषदेकडे (DDCA) ना हरकत प्रमानपत्र मागितले आहे. त्यानंतर डीडीसीएचे सचिव राजन मनचंदा यांच्याकडून या दोन्ही खेळाडूंनी ना हरकत प्रमाणपत्र दिले गेल्याची माहिती मिळाली. ध्रुव शौरी आगामी हंगामात विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो. नितीश राणाने तो कोणत्या संघाकडून खेळणार हे सांगितले नव्हते. मात्र, आता तो आगामी हंगामात उत्तर प्रदेशसाठी खेळणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, नितीश नाणा दिल्लीच्या संघ व्यवस्थापनावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या हंगामात त्याच्याकडून दिल्ली संघाचे कर्णधारपद काढून घेत यश धूल याला संघाचा नवीन कर्णधार बनवले गेले होते. याच पार्श्वभूमीवर राणाने संघ सोडल्याचे सांगितले जात आहे. पुढच्या हंगामात तो आणि रिंकू सिंग ही जोडी पुन्हा एकदा एकत्र खेळताना दिसेल. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये या दोघांनी कोलकाता नाईट रायडर्ससाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते. (There are reports that Nitish Rana will play for Uttar Pradesh in the upcoming domestic season)
महत्वाच्या बातम्या –
UAEच्या ऐतिहासिक विजयावर अश्विनची खास प्रतिक्रिया, सांगितले असोसिएट संघाच्या यशाचे कारण
BREAKING: स्पेनच्या महिलांनी उंचावला फुटबॉल विश्वचषक! अंतिम सामन्यात इंग्लंड पराभूत