भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीला सिडनी येथे आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना काही दिवस विश्रांती मिळाली आहे. यावेळात भारतीय संघाचे खेळाडू सध्या मेलबर्नमध्ये सराव करत आहेत, तसेच तेथील आजूबाजूच्या परिसरातही फिरत आहे. या दरम्यान भारतीय संघातील काही खेळाडू एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांचे जेवणाचे बिल चक्क एका चाहत्याने भरले होते. याबद्दल या चाहत्यानेच खुलासा केला होता. मात्र आता हे प्रकरण भारतीय खेळाडूंच्या अंगलट येऊ शकते.
चाहत्याने भरले जेवणाचे बिल
झाले असे की भारतीय संघातील रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत आणि नवदीप सैनी असे काही खेळाडू मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. दरम्यान त्याच ठिकाणी भारतीय संघाचा नवलदीप सिंग हा चाहताही आपल्या पत्नीसह आला होता.
Bc mere saamne waale table par gill pant sharma saini fuckkkkkk pic.twitter.com/yQUvdu3shF
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
त्याला या क्रिकेटपटूंना पाहून इतका आनंद झाला की त्याने त्यांचे बिलही भरुन टाकले, तसेच नंतर क्रिकेटपटूंनी आग्रह करुनही बिलाचे पैसे त्याने घेतले नाही. त्यामुळे त्याचे प्रेम पाहून पंतने त्याला मिठी मारली, असा दावा या चाहत्याने ट्विटरवर केला. याबरोबरच चाहत्याने क्रिकेटपटूंचे फोटोही काढले.
When they got know that i have paid the bill.. Rohit sharma said bhaji pese lelo yaar acha nai lagta.. i said no sir its on me. Pant hugged me and said photo tabhi hogi jab pese loge wapis. I said no bro not happening. Finally sabane photo khichwai 🙂 mja aa gya yaar #blessed
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
पंतची चूकी पडणार महागात
नवलदीपने ट्विटरवर त्याचा संपूर्ण अनुभव सांगितला आहे. मात्र आता त्याचमुळे भारतीय क्रिकेटपटूंना ही गोष्ट महागात पडण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि भारत संघाचे खेळाडू सध्या जैव सुरक्षित वातावरणात आहेत. त्यामुळे त्यांना काही बंधने लावण्यात आली आहेत. याच कारणामुळे दुसरा कसोटी सामना संपेपर्यंत स्टिव्ह स्मिथही त्याच्या पत्नीला भेटू शकला नव्हता.
खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात बाहेर जाण्याची आणि खाण्याची व वस्तू विकत घेण्याची परवानगी आहे मात्र त्यांना सोशल डिस्टसिंग न पाळता चाहत्यांना भेटण्याची परवानगी नाही.
मात्र, नवलदीपने त्याच्या ट्विटमध्ये केलेल्या दाव्यानुसार पंतने त्याला मिठी मारली. त्यामुळे कदाचीत जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला असल्याची शक्यता वर्तवली जात असून सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाचा तपास करत आहे, असे वृत्त डेली टेलिग्राफने दिले आहे.
६६८३ रुपये आलं बिल –
या चाहत्याने केलेल्या दाव्यानुसार त्याने भारतीय क्रिकेटपटूंच्या जेवणाचे 118.69 ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास 6683 भारतीय रुपये) बिल भरले.
महत्त्वाच्या बातम्या –
लॅब्यूशानेने घेतला भारतीय गोलंदाजांचा धसका, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सावध राहण्याचा केला इशारा
‘तो’ क्रिकेटर म्हणजे भारताचा भविष्यातील स्टार गोलंदाज, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले नाव
संकट टळले! इंग्लंड संघाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह, लवकरच ‘या’ दौऱ्यासाठी भरणार उड्डाण