लिजेंड्स लीग क्रिकेटचा पहिला क्वालिफायर इंडिया कॅपिटल्स आणि भीलवाडा किंग्ज यांच्यात रविवारी (2 ऑक्टोबर) खेळला गेला. गौतम गंभीर याच्या नेतृत्वातील इंडिया कॅपिटल्सने या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवून अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे. पण या क्वालिफायर सामन्यात खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहयला मिळाले. भीलवाडा किंग्जचा युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या मिचेल जॉन्सन यांच्यातील हा वाद पुढे हातापायीपर्यंत पोहोचला.
युसूफ पठाण (Yusuf Pathan) भारतीय संघाचा सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे. त्याने राष्ट्रीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. दुसरीकडे मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) देखील ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील दिग्गज वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळम्याचा देखील त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. या दोन माजी दिग्गजांना लिजेंड्स लीग क्रिकेटच्या मैदानात एकमेकांसोबत वाद घालताना पाहून अनेकांनी आश्चर्य वाटत आहे, तर अनेकांनी प्रसंग लाईव्ह पाहण्याचा आनंद लुटला. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत सुरुवातीला दिसते की, युसूफ आणि मिचेल जॉन्सन एकमेकांशी शाब्दी वाद घालत होते. काही वेळानंतर दोन्ही खेलाडू एकमेकांकडे चालत येतात आणि नंतर जॉन्सन युसूफला धक्का देतो. नंतर जॉन्सन तिथून जाताना त्याच्या चेहऱ्यावर हसू देखील दिसते. पण युसूफ मात्र चांगलाच संतापल्याचे दिसत होते. या दोघांती वाद मिटवण्यासाठी मैदानी पंचांना मध्ये हस्तक्षेप करावा लागला.
#ICYMI: Things got really heated in @llct20 between Yusuf Pathan and Mitchell Johnson. 🔥 pic.twitter.com/4EnwxlOg5P
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) October 2, 2022
दरम्यान उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर कॅरेबियन फलंदाज एश्ले नर्स (60*) मोठी आणि दमदार खेळी केली. भीलवाडा किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या नुकसानावर 226 धावांचे आव्हान उभे केले होते. पण तरीदेखील इंडिया लिजेंड्सने विजय मिळवला. इंडिया लिजेंड्ससाठी रॉस टेलरने सर्वाधिक अवघ्या 39 चेंडूत 84 धावा केल्या. फलंदाजांच्या वादळी खेळीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने 227 धावांचे लक्ष्य 6 विकेट्सच्या नुकसानावर आणि तीन चेंडू शिल्लक असताना गाठले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा डी कॉक! मिलरचे कौतुक करत स्वतः स्वीकारली पराभवाची जबाबदारी
टेन्शन वाढलं! हर्षल-अक्षर आणि अर्शदीपला मिळून चोपल्या गेल्या 160 धावा