---Advertisement---

यष्टीरक्षक फलंदाज धोनीने इतके विक्रम केले मात्र हा विक्रम राहुनच गेला

On: सोमवार, जून 15, 2020 7:37 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज समजले जाते. २०११ सालच्या वनडे विश्वचषकात धोनीने अंतिम सामन्यात मारलेला विजयी षटकार सर्वांना आठवत असणार. परंतु, वनडेत १० हजार पेक्षा जास्त धावा करणाऱ्या धोनीला एक फलंदाजी विक्रम मात्र करता आलेला नाही. पण, २ यष्टीरक्षकांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

खरं तर हा विक्रम वनडेच्या एका सामन्यात १५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करण्याशी संबंधित आहे. वनडे क्रिकेटमध्ये ८ असे यष्टीरक्षक आहेत, ज्यांनी कमीत कमी एका तरी सामन्यात १५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे.

धोनीनेही त्याच्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत एकदा १५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. ३१ ऑक्टोबर २००५रोजी जयपूर येथील श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यात धोनीने १४५ चेंडूत नाबाद १८३ धावांची खेळी केली होती. यात त्याच्या १५ चौकारांचा आणि १० षटकारांचा समावेश होता.

धोनीव्यतिरिक्त ५ असे यष्टीरक्षक फलंदाज आहेत, ज्यांनी वनडेत फक्त एकदा १५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. यामध्ये श्रीलंकाच्या कुमार संगाकारा, वेस्ट इंडिजच्या शाय होप, बांग्लादेशच्या लिट्टन दास, वेस्ट इंजिडच्या दिनेश रामादिन आणि न्यूझीलंडच्या ल्यूक रोंची यांचा समावेश आहे.

तर, जगात फक्त दोनच असे यष्टीरक्षक फलंदाज आहेत, ज्यांनी २ वेळा वनडेत १५०किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करण्याचा विक्रम केला आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट आणि दक्षिण आफ्रिकाच्या क्विंटन डी कॉक यांचा समावेश आहे.

गिलख्रिस्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु, डी कॉक अजूनही क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे त्याच्याकडे ३ वेळा १५० पेक्षा जास्त धावा करत हा विक्रम करणारा एकमेव यष्टीरक्षक बनण्याची संधी आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

‘विराट म्हणायचा; ‘ती’ अजूनही माझी गर्लफ्रेंड आहे, तर…

आख्ख्या चेन्नई सुपर किंग्जच्या चप्पल दुरूस्त करणाऱ्याला इरफानची मदत

‘तोपर्यंत भारत विश्वविजेता म्हणून ओळखला जाणार नाही’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---