सध्याच्या काळात कोणत्याही भारतीय खेळाडूने जर, आयपीएलमध्ये छाप सोडली तर त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सहज दरवाजे उघडतात. असे असले तरी अजूनही कसोटी संघाची निवड रणजी ट्रॅाफी, इराणी चषक आणि दुलीप ट्रॅाफी या प्रथम श्रेणी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर बऱ्याचदा केली जाते.
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल और जसप्रीत बुमराह या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. असे पण काही खेळाडू आहेत जे आयपीएल न खेळता भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करू शकतो. या लेखात आम्ही अशा ३ खेळाडूंबद्दल सांगत आहोत, जे आयपीएल खेळण्यापूर्वी भारतीय कसोटी संघात पदार्पण करू शकतात.
१. अभिमन्यू ईश्वरन
धडाकेबाज फलंदाज अभिमन्यू ईश्वरनची २०२१ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील देशांतर्गत आणि परदेशी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताचा राखीव खेळाडू देखील बनवण्यात आले होते.
त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६७ सामन्यांपैकी ४३.४५ च्या सरासरीने ४६०६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या खात्यात १४ शतक आणि १९ अर्धशतके जमा आहेत. तो निवडकर्त्याच्या नजरेत असून त्याला लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळू शकते.
अधिक वाचा – आयपीएल संघांची उडाली झोप; ‘हे’ प्रमुख इंग्लिश खेळाडू नसणार मेगा लिलावाचा भाग
२. प्रियांक पांचाल
प्रियांक पांचाल लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो. त्याने एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापुर्वी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा बाद झाला होता. तेव्हा प्रियांकला भारतीय कसोटी संघात सामाविष्ट करण्यात आले होते. पम या दौऱ्यात त्याला मयंक अगरवालच्या हजेरीमुळे त्याला संधी मिळाली नसली, तरी त्याला भविष्यात त्याच्यासाठी दरवाजे उघडे जाऊ शकतात.
प्रियांकने १०० सामन्यांमध्ये १६३ डावात ४५.५२ च्या सरासरीने ७०११ धावा केल्या असुन त्यामध्ये २४ शतकांचा तर २५ अर्धशतकांचा सामावेश आहे.
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?
३.अर्जन नागावासवाला
साल २०२१ मध्ये, अर्जन नागवासवालाला आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले होते. गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाने १८ प्रथम श्रेणी, २० लिस्ट ए आणि २० टी२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे ६७, ३९ आणि २८ विकेट घेतल्या आहेत. त्याच्याकडे भारतीय वेगवान आक्रमणाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. तो आयपीएलपूर्वी भारतीय कसोटी संघात पदार्पण करू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितनंतर खुद्द सिनियर शर्माजींची मैदानावर जोरदार फटकेबाजी, वडिलांच्या फलंदाजीवर ‘हिटमॅन’ही फिदा
“विराट आणि शास्त्री यांनी धोनीला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडले”
Photo: धोती-कुर्त्यात खेळाडू अन् संस्कृत भाषेत समालोचन, असा क्रिकेट सामना पाहिलाय का?