आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यातच आता संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित १३ व्या हंगामातून बाहेर पडला आहे.
ब्रावो दमदार गोलंदाजी करण्याबरोबर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही माहीर होता. अशात आता चेन्नईला त्याची उणीव न भासू देणाऱ्या पारंगत गोलंदाजाचा शोध आहे. आम्ही या लेखात, ब्रावोची जागा घेऊ शकणाऱ्या ३ दमदार खेळाडूंचा आढावा घेतला आहे. चला तर पाहूया..
डेविड विली-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेविड विली हा चेन्नई संघासाठी ब्रावोचा एक चांगला पर्याय ठरु शकतो. २०१८ साली त्याने चेन्नईकडून ३ आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत.
विली पावरप्लेमध्ये गोलंदाजी करताना विकेट्स घेण्याची क्षमता राखतो. सोबतच तो गोलंदाजी करण्याबरोबर फलंदाजी करताना मोठ-मोठे शॉट्स मारण्यातही तरबेज आहे. जरी त्याला आयपीएलमध्ये जास्त संधी मिळाली नसली, तरी त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २८ सामने खेळत ३४ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी ७ धावा ४ विकेट्स इतकी राहिली आहे.
तर टी२० क्रिकेटमध्ये १९ डावात फलंदाजी करताना त्याने १६६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८ चौकार आणि १० षटकारांचा समावेश आहे.
मिशेल स्टार्क-
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने टी२० विश्वचषक २०२०मध्ये जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी आयपीएल २०२०च्या लिलावात आपलं नाव दिलं नव्हत. पण आता विश्वचषक पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे स्टार्कला संधी मिळाली तर तो नक्कीच आयपीएलमध्ये सहभागी होईल.
स्टार्क हा टी२० क्रिकेटमधील जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. यापूर्वी तो आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांचा सदस्य होता. २०१४-१५ या आयपीएल हंगामात एकूण २७ सामन्यात त्याने ३४ विकेट्स आणि ९६ धावांची कामगिरी केली आहे.
मार्क वुड-
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला चेन्नईने आयपीएल २०२० लिलावात २ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण त्यानंतर त्यांनी त्याला रिलीज केले. पुन्हा कोणत्याही संघाने त्याची बोली लावली नाही.
मात्र हा ३० वर्षीय गोलंदाज १४५ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता राखतो. त्यामुळे चेन्नई संघ या वेगवान गोलंदाजाला ब्रावोच्या जागी स्थान देण्याचा विचार करु शकतो. मार्क वुडची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील आकडेवारी पाहायची झाली, तर त्याने ११ सामन्यात १८ विकेट्स चटकावल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू
धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिसा मिळूनही झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत संघासोबत गेले नाही पाकिस्तानला, जाणून घ्या कारण
शतक ठोकले पण इतिहास रचलाय हे माहिती नव्हतं, सामन्यानंतर धवनचे अचंबित करणारं वक्तव्य
मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम