आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन संयुक्त अरब अमिराती अर्थातच युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० या काळात होणार आहे. पहिल्यांदाच आयपीएलचे आयोजन वर्षात एवढ्या उशीरा होत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार व भारतीय संघाचा कॅप्टन कूल एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर होत असलेली ही पहिलीच आयपीएल. त्यामुळे या स्पर्धेला एक विशेष महत्त्व आले आहे.
धोनी नेतृत्त्व करत असलेला चेन्नई सुपर किंग्स संघ हा आयपीएलमधील यशस्वी फ्रंचायझी संघ आहे. चेन्नईने आतापर्यंत ३ वेळा (२०१०, २०११ आणि २०१८) आयपीएलचे विजेतेपद पटकाविले आहे.
याबरोबरच चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत सर्वाधिक वेळा उपविजेतेपदही पटकाविले आहे. याचा अर्थ असा की, आयपीएलमधील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी चेन्नईला अंतिम सामन्यात अडथळा निर्माण केला असणार. अशाच प्रकारच्या ३ दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी चेन्नईला सतत त्रास दिला आहे.
चेन्नईला सतत त्रास देणारे ३ खेळाडू- (3 players who constantly harass Chennai)
शिखर धवन-
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) शिखर धवन (Shikhar Dhawan) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आतापर्यंत २१ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६४१ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने ६ अर्धशतकही केले आहेत.
याव्यतिरिक्त धवनने आयपीएलमध्ये एकूण १५९ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३३.४२ च्या सरासरीने ४५७९ धावा केल्या आहेत. यामध्ये ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्मा-
रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला ४ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. तो त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याचा चेन्नई सुपर किंग्स संघाला त्रास देणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे.
त्याने चेन्नईविरुद्ध आतापर्यंत २७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २९.३७ च्या सरासरीने ७०५ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत १८८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३१.६० च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत.
विराट कोहली-
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challenger Bangalore) संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चेन्नई सुपर किंग्सने खूप त्रास दिला आहे. त्याने चेन्नईविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यंत २३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३७ च्या सरासरीने ७४७ धावा केल्या आहेत.
विराटने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत १७७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे ३ फलंदाज भारतीय संघाचे टॉप ३ फलंदाज आहेत. या खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला चेन्नईविरुद्ध चांगली कामगिरी करता आलेली नाही.