---Advertisement---

आशिया चषकात कोण असेल टीम इंडियाचा सलामीवीर? ‘या’ 3 फलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा

On: बुधवार, ऑगस्ट 20, 2025 10:55 PM
---Advertisement---

Asia Cup 2025 Team India Opening Pair: आशिया चषक 2025ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरपासून करणार असून, त्यांचा सामना यूएईसोबत होणार आहे. आशिया चषकासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणाही केली आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून शुबमन गिल, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, या तिघांपैकी कोणत्या 2 फलंदाजांना सलामीची जोडी म्हणून खेळण्याची संधी मिळेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गिल आणि अभिषेक आशिया चषकात भारतासाठी सलामी देतील, असे मानले जात आहे. त्यामुळे संजूला बाहेर बसावे लागू शकते. गिल सातत्याने धावा करत आहे, तर अभिषेकनेही भारतासाठी टी20 फॉरमॅटमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. दुसरीकडे, संजूने आयपीएल 2025 मध्ये दुखापतीमुळे अनेक सामने खेळले नाहीत, आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही तो विशेष काही करू शकला नाही.

आशिया कप 2025 साठी भारताचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग (India Squad Asia Cup 2025)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---