---Advertisement---

भारताविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हसरंगाची ‘लॉटरी’! आयपीएलचे ‘हे’ ३ संघ देऊ शकतात संधी

On: शुक्रवार, जुलै 30, 2021 3:49 PM
---Advertisement---

नुकताच भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत श्रीलंकेचा खेळाडू वानिंदू हसरंगा याने अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या कामगिरीचा फायदा त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्ये देखील झाला आहे. तो आयसीसी गोलंदाजांच्या यादीत ७२० रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे दाट शक्यता वर्तवली जात आहे की, तो सप्टेंबर महिन्यात सुरू आयपीएल २०२१ स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो. कोविडमुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. त्या खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. चला तर पाहूया असे तीन संघ जे वानिंदू हसरंगाला आपल्या संघात स्थान देऊ शकतात. (These 3 teams can buy wanindu hasaranga for remaining season of ipl 2021)

चेन्नई सुपर किंग्स: एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघात वानिंदू हसरंगाला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. यामागील मुख्य कारण म्हणजे, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याचे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणे कठीण दिसून येत आहे. त्यामुळे चेन्नईला अशा खेळाडूची आवश्यकता असेल जो गोलंदाजी सह फलंदाजी देखील करू शकतो. त्यामुळे वानिंदू हसरंगाला चेन्नई संघ आपल्या संघात स्थान देण्याचा विचार करू शकतो.

राजस्थान रॉयल्स : इंग्लंडचे खेळाडू आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसून येणार नाहीत. ज्याचा फटका राजस्थान रॉयल्स संघाला देखील बसणार आहे. संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स जर बाहेर झाला तर राजस्थान रॉयल्स एका अशा खेळाडूच्या शोधात असेल जो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करू शकतो. त्यामुळे वानिंदू हसरंगा हा राजस्थान रॉयल्स संघासाठी देखील उत्तम पर्याय ठरू शकतो.

सनरायझर्स हैदराबाद : श्रीलंकेचा खेळाडू वानिंदू हसरंगा हा आपल्या फिरकी गोलंदाजीने युएईच्या खेळपट्टीवर फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मध्यक्रमात अशा एका फलंदाजाची आवश्यकता आहे, जो संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करू शकेल. त्यामुळे वानिंदू हसरंगा हा सनरायझर्स हैदराबाद संघासाठी देखील उत्तम पर्याय ठरू शकतो.

आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु येत्या १९ सप्टेंबर पासून या स्पर्धेतील उर्वरित सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आहा कडक! नव्या लूकमध्ये अजूनच तरुण दिसतोय ‘कॅप्टनकूल’ धोनी, पाहून तुम्हीही व्हाल फिदा

टी२० विश्वचषकासाठी झहीर खानने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ, बघा कोण इन कोण आऊट

गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही पुढे! श्रीलंकेच्या ओपनरविरुद्ध योजनात्मक चेंडू टाकत चाहरने स्वत:च टिपला अप्रतिम झेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---