---Advertisement---

आयपीएल 2023च्या मिनी लिलावात ‘हे’ चार खेळाडू मालामाल, मिळाली 15 कोटींहून अधिक रक्कम

On: शुक्रवार, डिसेंबर 23, 2022 5:03 PM
Nicholas-Pooran-And-Ben-Stokes
---Advertisement---

जगभरात नावाजल्या जाणाऱ्या लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीगचाही समावेश होतो. आयपीएलचा 16वा हंगाम पुढील वर्षी पार पडणार आहे. यापूर्वी आयपीएल 2023चा मिनी लिलाव शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे पार पडला. हा लिलाव जरी मिनी असला, तरी यात खेळाडूंवर आयपीएल इतिहासातील मोठी बोली लावली गेली. संघांनी त्यांच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. विशेष म्हणजे, महागडे ठरलेले चारही खेळाडू परदेशी आहेत. एकाही भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लावण्यात संघांनी रस दाखवला नाही. चला तर या मिनी लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या 4 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया…

आयपीएल 2023 मिनी लिलावातील महागडे खेळाडू
आयपीएल 2023च्या मिनी लिलावात एकूण 4 खेळाडूंवर 15 कोटींहून अधिक रुपयांची बोली लावण्यात आली. या चार खेळाडूंमध्ये सॅम करन, कॅमरून ग्रीन, बेन स्टोक्स आणि निकोलस पूरन यांच्या नावांचा समावेश आहे.

https://twitter.com/IPL/status/1606227823877922817

https://twitter.com/IPL/status/1606234448663441409

चौघांवर पैशांचा पाऊस
सॅम करन (Sam Curran) याला पंजाब किंग्स संघाने 18.50 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. करनच्या टी20 विश्वचषक 2022मधील कामगिरीने प्रभावित होऊन पंजाबने त्याच्यावर विश्वास दाखवला. करन हा आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यानंतर या मिनी लिलावात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा ठरलेला खेळाडू म्हणजे कॅमरून ग्रीन (Cameron Green) होय. ग्रीनवर पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघाने 17.50 कोटी खर्च करत संघात सामील केले.

https://twitter.com/IPL/status/1606234538916601859

https://twitter.com/IPL/status/1606239408557916160

या दोघांव्यतिरिक्त बेन स्टोक्स (Ben Stokes) याला चेन्नई सुपर किंग्स संघाने सर्वाधिक 16.25 कोटी रुपयांच्या किंमतीत खरेदी केले. स्टोक्सनंतर या लिलावातील चौथा महागडा ठरलेला खेळाडू म्हणजे निकोलस पूरन (Nicholas Pooran) होय. विस्फोटक पूरनला लखनऊ सुपर जायंट्स संघाने तब्बल 16 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले.

या चार खेळाडूंवर आयपीएल 2023च्या मिनी लिलावात सर्वाधिक बोली लागली. (these 4 players sold at 15 crore above in IPL 2023 mini auction)

आयपीएल 2023च्या मिनी लिलावात महागडे ठरलेले खेळाडू
18.50 कोटी- सॅम करन (पंजाब किंग्स)
17.5 कोटी- कॅमरून ग्रीन (मुंबई इंडियन्स)
16.25 कोटी- बेन स्टोक्स (चेन्नई सुपर किंग्स)
16 कोटी- निकोलस पूरन (लखनऊ सुपर जायंट्स)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मूर्ती लहान कीर्ती महान! सॅम करन बनला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, पहिल्या पाचात एकच भारतीय
फ्लॉप पूरनची वाढली किंमत! तब्बल 16 कोटींसह ‘या’ संघासाठी उतरणार मैदानात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---