भारतीय संघाने 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती आणि आतापर्यंत एकूण 573 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 173 सामने जिंकले आहेत, तर 177 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाचे 222 सामने अनिर्णित राहिले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.
या 573 सामन्यांपैकी भारताने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 131 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 107 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 100 कसोटी सामने खेळले आहेत. तर भारताने न्यूझीलंड 62 आणि पाकिस्तानविरुद्ध 59 सामने कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 32 विजय मिळवले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध – 32
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 107 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 32 विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने 45 सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला आहे, तर 29 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत राहिला. 1947 मध्ये ब्रिस्बेन येथे दोन्ही संघांमधील पहिला सामना झाला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव आणि 226 धावांनी एकतर्फी जिंकला. 2023 मध्ये उभय संघांमध्ये शेवटच्या वेळी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
इंग्लंडविरुद्ध – 131
भारताने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 131 कसोटी सामने खेळले असून 31 सामने जिंकले आहेत. इंग्लंडने 50 सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला आहे, तर 50 सामने अनिर्णित राहिले आहेत. उभय संघांमधील पहिला सामना 1932 मध्ये लॉर्ड्सवर झाला होता आणि तो सामना इंग्लंडने 158 धावांनी जिंकला होता. भारताचा हा पहिलाच कसोटी सामना होता. उभय संघांमधील शेवटचा सामना 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे खेळला गेला होता, ज्यामध्ये इंग्लंडने भारताचा 7 विकेट्स राखून पराभव केला होता.
वेस्ट इंडिजविरुद्ध – 100
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 100 कसोटी सामने खेळले असून 23 सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने 30 सामने जिंकले, तर 47 सामने अनिर्णित राहिले. दोन्ही संघांमधील पहिला सामना 1948 मध्ये दिल्लीत झाला आणि तो सामना अनिर्णित राहिला होता. दोन्ही संघांमध्ये शेवटची कसोटी मालिका जुलै 2023 मध्ये खेळली गेली होती आणि भारताने ही मालिका 1-0 ने जिंकली होती. (These 4 teams have been defeated by India the most number of times in Test matches)
हेही वाचा
IND vs SA: दुसऱ्या कसोटी विजयासाठी केएल राहुल नेटमध्ये गाळतोय घाम, पाहा व्हिडिओ
Ashwin vs Gill: गिलपेक्षा अश्विनचे कसोटीमधील फलंदाजीचे आकडे सरस, पाहून तुम्हालाही बसेल धक्का