चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. गुरुवारी भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ समोरासमोर असणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सामना सुरू होणार आहे. बांग्लादेश संघासमोर भारतीय संघाचे पारडे जड आहे, परंतु बांग्लादेश संघ सामना पलटविण्यात माहीर आहे. गेल्या पाच वनडे सामन्यात भारतीय संघासमोर बांग्लादेश संघ जिंकत आलेला आहे.
मुस्तफिजुर रहमान बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान भारतीय फलंदाजांची चिंता वाढवू शकतो. यापूर्वी भारतीय संघाविरुद्ध मुस्तफिजुर रहमानचे प्रदर्शन उत्तम राहिले आहे. मुस्तफिजुर रहमान नवीन चेंडू ने स्विंग आणि जुन्या चेंडू ने स्लॉअर चेंडू फेकण्यात माहीर आहे.
मेहदी हसन मिराज तब्बल दोन वर्षांपूर्वी मेहदी हसन मिराज ने भारताविरुद्ध 8व्या क्रमांकावरती फलंदाजी करत शतक ठोकले होते. त्यावेळी भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. आत्ता पर्यंत बांग्लादेश विरूद्ध भारताला 5 वेळा हार पत्करावी लागली आहे. भारताला हरविण्यात मेहदी हसन मिराज याचा मोठा वाटा आहे.
तस्कीन अहमद तस्किन अहमद आपल्या वेगासोबतच नवीन चेंडू ने अती वेगवान स्विंग गोलंदाजी करतो. आता पर्यंत वनडे फॉरमॅट मध्ये तस्कीन अहमद ने 77 सामन्यात 109 षटक झळकविले आहेत. याशिवाय भारताविरुद्ध तस्किन अहमदची खेळी अप्रतिम आहे.
मुश्फिकुर रहीम बांग्लादेश संघातील अतिशय अनुभवी खेळाडू अशी ओळख आहे. मुश्फिकुर रहीम यांच्या जवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तब्बल 15 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. यामागील मोठ्या सामन्यात मुश्फिकुर रहीम यांनी भारताविरुद्ध चांगले प्रदर्शन केले आहे.
नजमुल हसन शांतो बांग्लादेश संघाचा कर्णधार यांची ओळख महान फलंदाज अशी केली जाते. नजमुल हसन शांतो एकटेच संपूर्ण सामना पलटवू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानच्या संघात मोठी कमतरता! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच रिजवानचा खळबळजनक खुलासा
भारतासमोर पाकिस्तानची शरणागती? कराचीत भारतीय ध्वज फडकला!
बाबर आझमला मागे टाकत शुबमन गिलनं गाठलं शिखर, आयसीसी क्रमवारीत बंपर फायदा