---Advertisement---

‘या’ 5 गोलंदाजांची आकडेवारी आहे खूपच आश्चर्यकारक, परंतु त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल

Top 5 Bowler
---Advertisement---

1 – जिम लेकर – एका कसोटीत 19 विकेट्स

जिम लेकर हा एक ऑफ-स्पिन गोलंदाज होता ज्याने 46 कसोटी सामन्यात 193 विकेट्स घेतले. इंग्लंडच्या या माजी क्रिकेटपटूची सरासरी 21.24 आणि स्ट्राइक रेट 62.3 आहे. जो खूप प्रभावी होता. पण याशिवाय 1956 मध्ये मँचेस्टरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा त्याचा स्पेल खूप खास होता.

या सामन्यात लेकरने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 9 विकेट्स घेतले आणि दुसऱ्या डावात 10 विकेट्स घेतल्या. त्याच्या मदतीने त्याच्या संघाने हा सामना 170 धावा आणि एका डावाने जिंकला. सामन्यात 19 बळी घेण्याचा त्याचा विक्रम अजूनही अबाधित आहे, याशिवाय अनिल कुंबळे याने कसोटीत एका डावात 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर इंग्लंडचा गोलंदाज सिडनी बर्न्सने 1913 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 विकेट्स घेतल्या होत्या.

2 – मार्क गिलेस्पी – 2.5 षटकात 7 धावा, 4 विकेट्स

मार्क गिलेस्पी याने 32 एकदिवसीय आणि 11 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या कारकिर्दी एवढी काही खास नाही, पण ही खास कामगिरी त्याच्या नावावर आहे. या किवी गोलंदाजाने डरबन येथे 2007 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत केनियाविरुद्ध धुमाकूळ घातला होता, त्यामुळे केनियाचा संपूर्ण संघ 73 धावांत ऑलआऊट झाला होता.

गिलेस्पीने पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड ओबुयाची विकेट घेतली. त्यानंतर केनियाचा कर्णधार असलेला स्टीव्ह टिकोलो यष्टीसमोर झेलबाद झाला. यानंतर 17 व्या षटकात गिलेस्पीने आणखी दोन विकेट घेतल्या आणि केनियाचाही डाव ऑलआऊट झाला. अशाप्रकारे, गिलेस्पीने 2.5 षटकांत 7 धावांत 4 विकेट्स घेतले, जे त्यावेळच्या टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचे होती.

3 – विल्फ्रेड रोड्स – 1110 प्रथम श्रेणी सामन्यात 4204 विकेट्स

आकडेवारी हे यशाचे मोजमाप मानले तर विल्फ्रेड रोड्स हा प्रथम श्रेणीचा सर्वात यशस्वी क्रिकेटपटू आहे. त्याने सर्वाधिक सामने खेळले आणि त्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्सही आहेत. रोड्सने 1110 सामन्यात 4204 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 58 शतके आणि 40 हजाराहून अधिक धावांची नोंद आहे.

त्याने इंग्लंडसाठी 58 कसोटी सामनेही खेळले, परंतु तो त्यात जास्त यशस्वी झाला नाही. त्याच्या नावावर 29.96 च्या सरासरीने 127 कसोटी विकेट्स आहेत. तर प्रथम श्रेणीत त्याची सरासरी 16.72 आहे. रोड्सच्या नावानर एक अनोखा विक्रमही आहे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 287 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

4 – बापू नाडकर्णी – 41 कसोटीमध्ये 1.67 ची इकॉनॉमी

बापू नाडकर्णी नेटमध्ये टप्प्याच्या ठिकाणी गोलंदाजीसाठी एक नाणे ठेवायचे. त्यामुळे या फिरकी गोलंदाजाची कामगिरी उत्कृष्ट ठरली. त्याच्या नावावर 41 कसोटी सामन्यांमध्ये 88 विकेट्स आहेत, परंतु त्याची सरासरी 1.67 होती जी अतुलनीय आहे. धावा रोखण्यासाठी तो एक आदर्श गोलंदाज होता. त्याच्या गोलंदाजीवर त्याचे जबरदस्त नियंत्रण होते.

बापूंनी 1964 मध्ये मद्रास येथे इंग्लंडविरुद्ध सलग 21 मेडन षटके टाकली होती. दोन्ही डावातील त्यांचे गोलंदाजी अशी होती, 32-24-23-0 आणि 34-24-24-1 एवढr धारदार गोलंदाजी करूनही बापूंना फार कमी विकेट मिळाल्या. पण दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांसाठी ते उपयुक्त ठरले.

5 – एल्फ व्हॅलेंटाईन – कसोटी सामन्याच्या एका डावात गोलंदाजी प्रदर्शन – 92-49-140-3

जर आपल्याला एल्फ व्हॅलेंटाईनला एखादे नाव द्यायचे असेल तर आपण त्याला बॉलिंग मशीन म्हणू शकतो. त्याच्याकडे सतत गोलंदाजी करण्याची अप्रतिम क्षमता होती. याशिवाय तो शारिरीक तसेच मानसिक दृष्ट्या खूप मजबूत होता. वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजाने 63 कसोटी डावात 12,953 चेंडू टाकले. प्रत्येक डावात त्याची सरासरी 34.26 षटकांची होती. त्याची लाईन आणि लेन्थ तितकीशी चांगली नसली तरी तो चेंडू वळवण्यात आणि ड्रिफ्ट करण्यात पटाईत होता.

तो एक मध्यमगती गोलंदाज होता, तर त्यावेळी वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेत होते. एल्फने 1950 मध्ये नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटके टाकली होती. या सामन्याच्या पहिल्या डावात विंडीजने आघाडी घेतली होती, मात्र, त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांच्या कामगिरीमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. इंग्लंडच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्यासाठी व्हॅलेंटाइनने 92 षटके टाकली त्यात 49 षटके मेडन होती. (These 5 bowlers have amazing statistics, but very few people know about them)

महत्वाच्या बातम्या

‘मी संघात माझे नाव…’, इंग्लंड कसोटी संघाच्या घोषणेनंतर स्टुअर्ट ब्रॉडची लक्षवेधी प्रतिक्रिया
आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतबद्दल दिग्गजाची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘बर्‍याच गोष्टी चुकीच्या…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---