भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला. त्यामुळे भारताचा विश्वचषकाचा प्रवास इथेच संपुष्टात आला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने या बदलाची सुरुवात मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्यासह पूर्ण निवड समिती बरखास्त केली आहे. या समितीत चेतन शर्मा, माजी क्रिकेटपटू देवाशीष मोहंती, हरविंदर सिंग, सुनील जोशी यांचा समावेश होता. यासह बोर्डाने नवीन निवड समितीसाठी अर्जही मागवले आहेत.
बीसीसीआयच्या नियमानुसार, अर्ज करणाऱ्या व्यक्तीला कमीत की 7 कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने किंवा 10 वनडे सामने किंवा 20 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असायला पाहिजे. तसेच, खेळाडूने निवृत्त होऊन 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला पाहिजे. अशात यासाठी अनेक अर्ज येऊ शकतात. मात्र, आज या लेखात आपण त्या 5 प्रसिद्ध भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे इच्छा असूनही भारतीय संघाचे निवडकर्ता बनू शकत नाहीत.
कोण आहेत ते खेळाडू?
एमएस धोनी
भारतीय संघाचा निवडकर्ता बनू न शकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा समावेश आहे. खरं तर, धोनीने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. याचा अर्थ त्याने निवृत्ती घेऊन आता फक्त 2 वर्षे झाली आहेत. यासोबतच धोनी आयपीएलही खेळत आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. अशात धोनी बोर्डाने बनवलेल्या नियमांमध्ये फिट बसत नाही.
युवराज सिंग
या यादीत दुसरे नाव भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे आहे. युवराजही आता भारतीय संघाचा निडवकर्ता होऊ शकत नाही. खरं तर, त्याने सन 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, याचा अर्थ असा की, त्याला निवृत्ती घेऊन 3 वर्षे लोटली आहेत. तसेच, युवराज रोड सेफ्टी स्पर्धेतही खेळतो. त्यामुळे तो नियमात बसत नाही.
हरभजन सिंग
या यादीतील तिसरे नाव भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचे आहे. तो भारतीय संघाचा निवडकर्ता होऊ शकत नाही. खरं तर, हरभजनने डिसेंबर 2021मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. म्हणजेच, त्याने निवृत्ती घेऊन अजून एक वर्षही पूर्ण झाले नाहीये. हरभजनने 100हून अधिक कसोटी आणि 200हून अधिक वनडे सामने खेळले असले, तरी तो बोर्डाच्या नियमात फिट बसत नाही.
गौतम गंभीर
या यादीतील चौथे नाव भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचे आहे. गंभीरलाही इच्छा असूनही भारतीय संघाचा निवडकर्ता बनता येऊ शकत नाही. खरं तर, गंभीरने सन 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. याचा अर्थ असा की, त्याला निवृत्ती घेऊन 4 वर्षे झाली आहेत. त्यानेही 50पेक्षा अधिक कसोटी आणि 100 पेक्षा अधिक वनडे आणि 30 पेक्षा जास्त टी20 सामने खेळले आहेत. तरीही तो बोर्डाने बनवलेल्या नियमांमध्ये फिट बसत नाही.
रॉबिन उथप्पा
भारतीय संघाचा निवडकर्ता बनू न शकणाऱ्या खेळाडूंमध्ये शेवटचे नाव रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याचे आहे. उथप्पा याचीही गणना भारताच्या विस्फोटक खेळाडूंमध्ये होते. मात्र, तो बोर्डाने आखलेल्या नियमांमध्ये बसत नाही. कारण, त्याने यावर्षी सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच, नियमानुसार, खेळाडूला निवृत्ती घेऊन 5 वर्षे पूर्ण झाली पाहिजेत. यामुळे तो भारतीय संघाचा निवडकर्ता बनू शकत नाही. (these 5 former players of team india who can not become the selectors of the indian team know why)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट विश्वचषकाची बक्षीस रक्कम फुटबॉल वर्ल्डकपच्या तुलनेत पाणी कम चाय! आकडा वाचून येईल आकडी
भारत आणि न्यूझीलंडच्या दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट? पाहा कसे असेल वातावरण