येत्या २६ डिसेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकली नाहीये. त्यामुळे यावेळी भारतीय संघ जोरदार कामगिरी करून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशातच भारतीय संघात ५ असे खेळाडू आहेत. ज्यांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष टिकून असेल.
१) विराट कोहली (Virat Kohli) :
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला गेल्या काही महिन्यांपासून मोठी खेळी करता आली नाहीये. सध्या तो ज्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढू शकते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके झळकावली आहेत. सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सचिन तेंडुलकर (१०० ) आणि रिकी पाँटिंग (७१) नंतर तिसरा फलंदाज आहे. त्याने शेवटचे शतक २०१९ मध्ये झळकावले होते. त्यानंतर २ वर्ष उलटून गेली तरीदेखील त्याला शतक साजरं करता आलं नाहीये.
त्याने २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या कोलकाता कसोटीत १३६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर २३ डाव उलटून गेले तरीदेखील त्याने शतक झळकावले नाहीये. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत तो शतकांची प्रतीक्षा संपवणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने १० डावात ५५.८० च्या सरासरीने ५५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतक आणि दोन अर्धशतक झळकावले आहे.(5 indian players in India vs South Africa series)
२) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) :
भारतीय संघातील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराला देखील गेल्या २ वर्षात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. २०२० मध्ये त्याने ८ डावात २०.३७ च्या सरासरीने १६३ धावा केल्या होत्या. तर २०२१ मध्ये त्याने २४ डावात २९.८२ च्या सरासरीने ६८६ धावा केल्या आहेत. त्याने ३ वर्षांपूर्वी आपले शेवटचे शतक झळकावले होते. सिडनीच्या मैदानावर त्याने १९३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर ४२ डाव उलटून गेले आहेत. तरीदेखील त्याला शतक झळकावण्यात यश आले नाहीये.
तसेच त्याच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण २३ डावात ३२. ९५ च्या सरासरीने ७५८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेत त्याने १३ डावात ४११ धावा केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सतत फ्लॉप ठरत असल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी करून त्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे.
३)श्रेयस अय्यर(Shreyas iyer) :
नुकताच संपन्न झालेल्या भारत विरुध्द न्यूझीलंड कसोटी मालिकेत भारतीय संघाने १- ० ने विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. पदार्पणाच्या सामन्यात श्रेयस अय्यरने अप्रतिम खेळी करत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. श्रेयस अय्यरने वनडे आणि टी२० मध्ये भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. जर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरले तर त्यांच्या ऐवजी श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते.
४) आर अश्विन(R Ashwin ):
आर अश्विन देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकताच न्यूझीलंड संघाविरुद्ध संपन्न झालेल्या कसोटी मालिकेत हरभजन सिंगचा (४१७) सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मोडला होता. आता सध्या तो भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. तो अनिल कुंबळे (६१९) आणि कपिल देव (४३४) नंतर सर्वाधिक गडी बाद करणारा (४२७ ) तिसरा गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याला कपिल देव यांचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
५) जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah):
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर पुनरागमन करतोय. त्याला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी आणि टी२० मालिकेत संधी देण्यात आली नव्हती. जसप्रीत बुमराहच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर त्याने २४ कसोटी सामन्यात १०१ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने ६ वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
काय सांगता? विश्वविक्रमवीर एजाजची न्यूझीलंड संघातून गच्छंती; प्रशिक्षक म्हणतायेत…
Video: लाईव्ह सामन्यातील ‘ब्रोमान्स’ची इंटरनेटवर तुफान चर्चा, कर्णधाराचे मैदानातच गोलंदाजाला किस
हे नक्की पाहा:
काय सांगता? विश्वविक्रमवीर एजाजची न्यूझीलंड संघातून गच्छंती; प्रशिक्षक म्हणतायेत…