आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी सर्वांनाच स्टार खेळाडूंकडून दमदार प्रदर्शनाची आशा होती. रोहित शर्मा याच्यापासून ते विराट कोहली, बाबर आझम, डेविड वॉर्नर, क्विंटन डी कॉक, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मिचेल स्टार्क यांसारख्या खेळाडूंची चर्चा सुरू होती. या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केलीच, पण स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सर्वांना सरप्राईज मिळाले. आता स्पर्धेतील 30हून अधिक सामने पार पडले असून अजूनही सरप्राईज मिळतच आहेत. एकीकडे, स्टार खेळाडू विकेट आणि धावा करण्यासाठी संघर्ष करत आहेत, तर दुसरीकडे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. चला तर, या खेळाडूंविषयी जाणून घेऊयात…
अझमतुल्लाह उमरजाई
अफगाणिस्तान संघाचा स्टार खेळाडू अझमतुल्लाह उमरजाई (Azmatullah Omarzai) याला आशिया चषकादरम्यान संघातून वगळले होते. मात्र, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत त्याला जागा मिळाली. तसेच, त्याने कमाल फलंदाजी केली. भारताविरुद्ध त्याने शतक ठोकले होते. सचिन तेंडुलकर याने तर त्याची तुलना प्रवीण कुमार आणि भुवनेश्वर कुमार यांच्याशी केली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही मॅच विनिंग अर्धशतक झळकावले होते. त्याने आतापर्यंत 6 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, 203 धावाही केल्या आहेत. त्यात 2 अर्धशतकांचाही समावेश आहे.
गेराल्ड कोएट्जी
दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जी (Gerald Coetzee) विश्वचषकापूर्वी फक्त 6 वनडे सामने खेळले आहेत. त्याच्याकडे भारतात खेळण्याचा अनुभवही नव्हता. मात्र, 5 सामने खेळताना त्याने 12 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. नवीन चेंडूसह त्याच्या गतीने फलंदाजांना खूपच त्रास होत आहेत. श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने प्रत्येकी 3 फलंदाजांची शिकार केली आहे.
दिलशान मधुशंका
श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका (Dilshan Madushanka) दुखापतीमुळे आशिया चषक 2023 स्पर्धेत खेळू शकला नव्हता. विश्वचषकाच्या सराव सामन्यातही त्याला यश मिळाले नव्हते. मात्र, स्पर्धेत तो चांगली गोलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत 6 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 1 षटकात डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना तंबूचा रस्ता दाखवला होता.
अब्दुल्ला शफीक
पाकिस्तान संघ विश्वचषकात सध्या खूपच खराब कामगिरी करत आहे. मात्र, अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) याने आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले. फखर जमान याच्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळण्याची आशा नव्हती. मात्र, संधी मिळताच त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकत संघाला विजयी केले. त्याने 5 सामन्यात 52.80च्या सरासरीने 264 धावा केल्या आहेत.
रचिन रवींद्र
केन विलियम्सन आणि लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त झाल्यामुळे रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याला न्यूझीलंड संघाकडून विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. विश्वचषकापूर्वी त्याने कधीही अव्वल 5 क्रमांकामध्ये फलंदाजी केली नव्हती. मात्र, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत त्याने शतक ठोकले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही शतक केले. त्याची स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 6 सामन्यात 81.20च्या सरासरीने 406 धावा केल्या आहेत. स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. (these 5 players who surprised everyone with performance world cup 2023 see list)
हेही वाचा-
गौतम गंभीरचे रोहितविषयी मोठे विधान; म्हणाला, ‘तो कर्णधारच नाही…’
जबरदस्त! वयाच्या 23व्या वर्षी आफ्रिदीने घडवला इतिहास, फक्त ‘एवढ्या’ सामन्यात पूर्ण केल्या 100 विकेट्स