मंगळवारचा (दि. 05 सप्टेंबर) दिवस भारतासोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी खूपच महत्त्वाचा ठरला. कारण, या दिवशी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीप्रमुख अजित आगरकर यांनी 15 सदस्यीय भारतीय संघांची घोषणा केली. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत असे काही खेळाडू पाहायला मिळणार आहेत, जे पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. चला तर ते खेळाडू कोण आहेत, हे पाहूयात…
पहिल्यांदाच वनडे विश्वचषक खेळणारे भारतीय खेळाडू
भारतीय संघाकडून वनडे विश्वचषकात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये 3 फलंदाज, एक यष्टीरक्षक फलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाज अशा एकूण 6 खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू इतर कुणी नसून शुबमन गिल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज या धुरंधरांचा त्यात समावेश आहे.
या खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर शुबमन गिल हा मागील काही काळापासून शानदार कामगिरी करत आहे. अलीकडे, त्याचा फॉर्म घसरला होता, पण त्याने नुकत्याच आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत नेपाळविरुद्ध 62 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी साकारली होती. यात 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. तसेच, श्रेयस अय्यर याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो दुखापतीमुळे मागील काही काळापासून भारतीय संघाचा भाग नव्हता. मात्र, तो आता फिट झाला असून संघात परतला आहे. तो विश्वचषकात कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याव्यतिरिक्त ईशान किशन हा यष्टीरक्षक फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ईशानने खेळलेल्या मागील 4 डावांमध्ये सलग अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. सूर्यकुमार यादव याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याचा वनडे क्रिकेटमधील फॉर्म तितका चांगला नाहीये. मात्र, त्याला संघात स्थान दिले गेले आहे. त्यामुळे तो विश्वचषकात संधी मिळाली, तर कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरले.
तसेच, शार्दुल ठाकूर हा अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाला विश्वचषकात चेंडू आणि बॅट दोन्ही विभागात उपयुक्त ठरू शकतो. यादीतील सहावा खेळाडू मोहम्मद सिराज याच्याविषयी बोलायचं झालं, तर सिराज सध्या आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांच्या भुवया उंचावत आहे. त्याने आशिया चषकात नेपाळविरुद्ध खेळताना 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तसेच, तो वनडे रँकिंगमध्ये अव्वल 5 गोलंदाजांमध्ये सामील आहे. अशात या सहा खेळाडूंपैकी कोणत्या खेळाडूला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळते, हे पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
भारताकडून पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात खेळणारे खेळाडू
शुबमन गिल
श्रेयस अय्यर
ईशान किशन
सूर्यकुमार यादव
शार्दुल ठाकूर
मोहम्मद सिराज
वनडे विश्वचषक 2023साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल (these 6 Indian players playing ODI World Cup for the first time)
महत्त्वाच्या बातम्या-
धवनसह ‘या’ 4 खेळाडूंना नाही मिळाली संघात संधी, विश्वचषकातून पडले बाहेर
आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यासह सुपर-4 सामने होणार शिफ्ट? मोठी बातमी आली समोर