2022 हे वर्ष संपायला अगदी काही दिवस शिल्लक राहिलेत. या सरत्या वर्षात बऱ्याच गोष्टी अशा होत्या, ज्याची आपण आतुरतेेने वाट पाहिली. आपल्या भारतीय लोकांमध्ये कोणत्या गोष्टीची आतूरता असो वा नसो,पण क्रिकेटच्या मॅचसाठी सगळे आतुरतेेने वाट बघतात आणि जर सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असेल तर सामना संपेपर्यंत लोक टीव्हीपासून दूर जात नाही.
एकेकाळी लोक वर्तमानपत्रात छापून आलेल्या सामन्यांच्या वेळापत्रकाचे कात्रण काढून जपून ठेवायचे, पण आताचा काळ काही तसा राहिलेला नाही. जर एखाद्या सामन्याविषयी माहिती जानून घ्यायची असेल तर सर्वजण आपला स्मार्टफोन काढून गुगलचा वापर करतात. कोणता सामना कधी, कोणत्या दिवशी आहे, त्या सामन्याची वेळ, तो सामना कोणत्या मैदानावर खेळवला जाणार ही सगळी माहिती गुगुलवर काही सेंकदात प्रकट होते. आज आपण याबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत. 2022मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सामन्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
1.भारत विरुद्ध इंग्लंड
जाागतिक स्तरावर 2022 या वर्षात सर्च केलेला सामना म्हणजे भारत विरुद्ध इंग्लंड. भारत आणि इंग्लंड या संघात खेळवलल्या गेलेल्या टी20 मालिकेतील हा तिसरा सामना होता. या सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करत 215 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 198 धावा करता आल्या. भारतासाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने झंझावती शतक झळकावले होते. त्याने 55 चेंडूत 14 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या होत्या.
2. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
जगात गुगलवर सर्च केलेल्या सामन्यांच्या यादीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये 6 ऑक्टोबर 2022 या दिवशी खेळवला गेला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये खेळल्या गेलेल्या तिन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना होता. हा सामना भारताने 9 धावांनी गमावला होता.
3. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या सामन्यांच्या यादीत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना तिसऱ्या क्रमांकावर आहे. सामना 24 जुलै 2022ला वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 2 गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दिलेले 312 धावांचे आव्हान भारताने 2 चेंडू शिल्लक ठेवत गाठले. भारतासाठी अक्षर पटेल (Axar Patel) याने भारतासाठी चांगली फलंदाजी केली होती. त्याने 35 चेंडूत 64 धावा केलेल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
4. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना 20 सप्टेंबर 2022 या दिवशी मोहाली येथे खेळवला गेला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघामध्ये खेळवल्या गेलेल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी20 सामना होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 4 विकेटने विजय मिळवला होता.
5.भारत विरुद्ध श्रीलंका
भारत आणि श्रीलंका संघांमध्ये हा सामना 27 फेब्रुवारी 2022या दिवशी खेळवला गेला. भारत आणि श्रीलंका या संघांमधील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा सामना होता. या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करत 146 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 19 चेंडू शिल्लक ठेवत 6 विकेटनेे जिंकला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला सामनावीर आणि मालिकावीराचा किताब देण्यात आला होता.(These are most serched matches on google in the year 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अपघातग्रस्त पंतनंतर कोण होणार दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार, ‘या’ खेळाडूंची नावे चर्चेत
नीरज चोप्रा ते महिला हॉकी! एक नजर भारताच्या 2022 मधील प्रभावशाली कामगिरीवर