यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे स्पर्धा पाहायला मिळाल्या. याच वर्षी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. तसेच यावर्षी व्यस्त वेळापत्रकामुळे जास्त वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. संपूर्ण वर्षभरात झालेल्या वनडे सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मानाचा ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार’ (icc odi cricketer of the year) दिला जातो. २०२१ वर्षाच्या पुरस्कारासाठी आयसीसीने ४ नामांकन जाहीर केले आहे.
आयसीसीचा मानाचा पुरस्कार मिळवण्यासाठी ४ खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम( Babar azam), बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) , आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (Paul sterling) आणि दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान (Janeman malan) यांचा समावेश आहे.
शाकिब अल हसनच्या या वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ९ सामन्यात ३९.५७ च्या सरासरीने २७७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजी करताना १७.५२ च्या सरासरीने १७ गडी बाद केले आहेत. शाकिब अल हसनने या वर्षाची सुरुवात चांगली केली होती. त्याची वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवड करण्यात आली होती.
तसेच पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने ६ वनडे सामन्यात अप्रतिम कामगिरी करत २२८ धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याची प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवड करण्यात आली होती. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने २-१ ने विजय मिळवला होता.
🇧🇩 🇵🇰 🇿🇦 ☘️
Four stars have been nominated for the ICC Men's ODI Player of the Year 2021 award 💥
Details 👇https://t.co/C2sZWGeIOV
— ICC (@ICC) December 30, 2021
तसेच जानेमन मलानने ८ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ८४.३३ च्या सरासरीने ५०९ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ शतक आणि २ अर्धशतक झळकावले होते. या खेळीच्या जोरावर त्याला आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
टीम इंडियासाठी ‘पुढील वरीस मोक्याच’! टी२० विश्वचषकासह खेळणार ‘या’ महत्वाच्या मालिका
नव्या आयसीसी क्रमवारीत अश्विनने उंचावला टीम इंडियाचा झेंडा; रोहित-विराट ‘या’ क्रमांकावर
हे नक्की पाहा: