जागतिक क्रिकेट जगतात सध्या भारतीय संघाचा सुवर्णकाळ सुरू आहे. पूर्वी भारतीय क्रिकेटला फक्त फलंदाजांचा संघ म्हणून ओळखले जात होते आणि गोलंदाजी हा भारताचा कमजोर बाजू होती. परंतु गेल्या काही वर्षात भारताची वेगवान गोलंदाजांनी मोठ्या प्रमाणात आपली छाप पाडलेली आपल्याला दिसून येते. जागतिक दर्जाचे गोलंदाज भारतीय संघाकडे आहे. आज भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसारखे अनुभवी दिग्गज गोलंदाज आहे.
आज भलेही ह्या गोलंदाजांचा बोलबाला असला तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत भुवनेश्वर कुमार हा भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जात होता. परंतु, २०१७ नंतर भुवनेश्वर कुमारला आपल्या शारीरिक तंदुरुस्तीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे बऱ्याच वेळा तो अडचणीत दिसला. त्यानंतर भुवनेश्वरने भारतीय संघात पुनरागमन केले, परंतु दुखापतीमुळे तो बाहेर गेला. गेल्या काहीवर्षात दुखापतीमुळे तो सतत भारतीय संघात आत-बाहेर करत आहे. त्यामुळे आपण या लेखात अशा तीन गोलंदाजांबद्दल जाणून घेऊ जे अगामी टी२० विश्वचषकात त्याची जागा घेऊ शकतात.
३. नवदीप सैनी:
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात युवा वेगवान गोलंदाजांनी आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केलय. ह्या युवा गोलंदाजांपैकी एक नाव म्हणजे ‘नवदीप सैनी’ होय. दिल्लीच्या या युवा गोलंदाजांला रॉयल चॅलेंजर बंगलोरकडून खेळतांना आपली छाप सोडल्यामुळे राष्ट्रीय संघाचा भाग होण्याची संधी मिळाली होती. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर देखील सैनीने आपल्या कामगिरीने सगळ्यांना प्रभावित केले. परंतु, काही वेळेपासून त्याची लय बिघडलेली आहे. पण त्याच्यात क्षमता आहे की तो संघात पुनरागमन करून आपली प्रतिभा दाखवेल.
२. दीपक चाहर:
आयपीएलने भारतीय संघाला अनेक प्रतिभावान खेळाडू दिले, ज्यात राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हे देखील एक नाव आहे. दीपक चाहरने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी प्रभावी गोलंदाजीचा मारा केला होता, त्यामुळे भारतीय संघात त्याला संधी देण्यात आली. दीपक चeहर हा विशेषतः टी२० क्रिकेट प्रकारात एक जबरदस्त गोलंदाज मानला जातो. त्याची स्विंग गोलंदाजी आणि नव्या चेंडूवर प्रभावी मारा यामुळे त्याला विश्वचषक स्पर्धेत प्रमुख पसंती दिली जाऊ शकते.
१. मोहम्मद सिराज:
भारतीय क्रिकेट संघात ज्या खेळाडूने गेल्या काही महिन्यांत आपलं नाणं खणखणीत असल्याचा पुरावा दिला आहे, तो दुसरा तिसरा कुणी नसून युवा गोलंदाज मोहम्मद सिराज होय. मोहम्मद सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येदेखील संधी दिली गेली होती. परंतु त्यात त्याला सातत्य राखता आले नाही. परंतु सध्या ज्याप्रकारे तो कामगिरी करतोय, त्यावरुन तो भारतासाठी विश्वचषक स्पर्धेत नक्कीच जागा मिळवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनल: ‘रोहित खेळला तर द्विशतक करुनचं शांत बसेल,’ दिग्गजाला आहे विश्वास
इंग्लंड सरकारचा मोठा निर्णय, दौर्यावर येणार्या भारतीय खेळाडूंना दिली ‘ही’ सूट
काय सांगता!! ‘या’ महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट बाहेर