---Advertisement---

‘या’ 5 चुका आधीच सुधारल्या असत्या, तर भारत पाकिस्तानविरूद्ध खेळला असता फायनल

On: गुरूवार, नोव्हेंबर 10, 2022 10:43 PM
indian team
---Advertisement---

भारतीय संघाला उपांत्य सामन्यात गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) इंग्लंडकडून 10 विकेट्सने दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या गोलंदाजी विभागाने तर अक्षरश: भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणीच फेरले. या पराभवानंतर भारतीय संघाच्या कमकुवतपणाच पितळ उघड पडलं आहे. याला अनेक कारणं आहेत. त्यातील भारताच्या पराभवाची 5 कारणे जाणून घेऊया.

कारण 1-
संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघाला पॉवरप्लेमध्ये समाधानकारक धावा करता आल्या नाहीत. भारतीय संघाचा खेळ पाहून असेच वाटले की, पॉवरप्ले हा जपून खेळण्यासाठी असतो.  या उपांत्य फेरीच्या सामन्यात देखील टीमने पहिल्या 5 षटकांत 38 धावा केल्या. दुसरीकडे इंग्लंडने याच 5 षटकांत तब्बल 63 धावा कुटल्या. विशेष म्हणजे त्यांचा एकही खेळाडू बाद झाला नाही.

कारण 2-
भारतीय संघाला संपूर्ण टी20 विश्वषकात सर्वात जास्त ओपनिंगच्या फॉर्मने सतावलं. विश्वचषकाचा एखादा सामना सोडला तर बाकी सर्व सामन्यात भारतीय सलामीवीरांनी प्रत्येकवेळी निराशाच केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) व केएल राहुल (KL Rahul) यांना शेवटपर्यंत परफॉर्म करता आलं नाही. केएल राहुलच्या दोन खेळी या कमकुवत संघाविरुद्ध होत्या. त्या दोन सोडल्या तर तो व रोहितची कामगिरी फारच सुमार राहिली.

कारण 3-
नाणेफेक जिंकणं या सामन्यात इंग्लंडच्या पथ्थ्यावर पडलं. कारण संपूर्ण विश्वचषकात नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणं अनेक संघांना फायद्याचं ठरलं. भारतीय संघही चेस करण्यासाठी वाकबगार संघ मानला जातो. परंतु अतिशय महत्त्वाच्या वेळी भारतीय संघाला तो गमवावा लागला.

कारण 4-
रोहित शर्मा (Rohit Sharma) याची कॅप्टन्सीही या विश्वचषकात म्हणावी तशी काम करू शकली नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार व टीम इंडियाचा कर्णधार यातील ठळक फरक पाहायला मिळाला. रोहितच्या कर्णधार म्हणून देहबोलीतूनही अनेक गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. सेमीफायनलला रोहितने ज्या प्रकारे गोलंदाज रोटेट केले ते समजण्यापलीकडे होते. उपांत्यफेरीच्या या सामन्यात क्षेत्ररक्षणाच्यावेळी पॉवरप्लेमध्ये स्लीपमध्ये केवळ एकच खेळाडू ठेवला, यावरून समजते भारतीय संघ बचावात्मक पवित्रेत खेळत आहे.

कारण 5-
भारतीय गोलंदाजांकडून म्हणावी तशी कामगिरी होताना दिसली नाही. संघात जसप्रीत बुमराह किंवा जडेजा सारखे खेळाडू नसल्याची स्पष्ट उणीव जाणवली. भुवनेश्वर कुमारसारख्या गोलंदाजाकडून कुणालाही सुमार कामगिरीची अपेक्षा नव्हती. उमद्या दमाच्या अर्शदीप सिंगने सोडून कुणीही चांगली कामगिरी केली नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चहलवर अन्याय झाला का? संपूर्ण विश्वचषकात पाणीच पाजत राहिला ‘लेग स्पिन ग्रॅंडमास्टर’
‘लवकरच काही वरिष्ठ खेळाडू रिटायरमेंट घेतील’; भारतीय दिग्गजाचे भाकीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---