यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय संघाकडे यावर्षीच्या विश्वचषकाचे जयमानपद असणार आहे. मायदेशातील परिस्थितीचा भारतीय संघाला फायदा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. असे असले तरी, भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यावर्षी मार्च महिन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळली. या मालिकेत अय्यरला दुखापत झाली आणि त्याला अर्ध्यातच संघाची साथ सोडावी लागली. अद्यापही तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नाहीये. 2019 नंतर भारतीय संघाने चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी 8 फलंदाजांना आजमावून पाहिले आहे. मात्र, त्यातील बहुतांश फलंदाजांनी निराश केले आहे. अशात वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण असणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आपण या लेखात अशाच पाच फलंदाजांचा विचार करणार आहोत, जे वनडे विश्वचषकात संघासाठी चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करू शकतात.
1. श्रेयस अय्यर –
वनडे क्रिकटेमध्ये भारतासाटी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मागच्या काही वर्षांमध्ये सर्वोत्तम पर्याय राहिला आहे. मागच्या विश्वचषकानंतर तौ संघासाठी चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 22 सामन्यांमध्ये 47.35च्या सरासरीने 805 धावा निघाल्या आहेत. यात 2 शतक आणि 5 अर्धशतके आहेत. श्रेयस अय्यर विश्वचषकापूर्वी पूर्णपणे फिट असेला, तर त्याला पुन्हा चौथ्या क्रमांकवर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. पण यासाठी त्याला आफली गुणवत्ता आणि फिटनेस नक्कीच सिद्ध करावी लागेल.
2. केएल राहुल –
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकला नाहीत, तर संघाकडे इतर काही पर्याय आहेत. यापैकी केएल राहुल (KL Rahul) हा याचा विचार सर्वात आधी करावा लागेल. मागच्या विश्वचषकानंतर राहुलने या क्रमांकावर खेळताना 4 सामन्यांमध्ये 63.00च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत.
3. अजिंक्य रहाणे –
भारतीय संघासाठी मागच्या पाच वर्षांमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला एकही वनडे सामना खेलण्याची संधी मिळाली नाहीये. मात्र, मागच्या काही महिन्यांमध्ये त्याचा फॉर्म जबरदस्त राहिला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी, त्यानचंर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासाठी त्याने महत्वपूर्ण योगदान दिले. याच कारणास्तव त्याला आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यातही निवडले गेले आहे. अशात वनडे विश्वचषकासाठी त्याची संघात निवड झाली, तर रहाणे नक्कीच चौथ्या क्रमांकाचा भार आपल्या खांद्यावर घेऊ शकतो.
4. संजू सॅमसन –
वनडे विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी संजू सॅमसन (Sanju Samson) देखील चांगला पर्याय असेल. वनडे क्रिकेटमध्ये सॅमसनने भारतासाठी 11 सामन्यांमधील 10 डावात 100 पेक्षा जास्त स्ट्राई रेटने आणि 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतके आहेत. पण सॅमसनला वनडे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव अद्याप मिळाला नाहीये. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी पाच आणि सहाव्या क्रमांकवर त्याने धमाकेदार फलंदाजी केली आहे.
5. सूर्यकुमार यादव –
भारतीय संघाचा हा फलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच धमाका करत आहे. 32 वर्षीय सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानाच्या चारही दिशेला फटकेबाजी करू शकतो. आपल्या धमाकेदार खेलीच्या जोरावर त्याने भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले. पण वनडे क्रिकेटमध्ये त्याचा अपेक्षित यश मिळाले नाहीये. 21 वनडे डावांमध्ये त्याने 24.05च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. यातील पाच डावांमध्ये त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि फक्त एकदा दोन आकडी धावसंख्या करू शकला आहे. असे असले तरी, वनडे क्रिकेटमध्ये एकदा जर त्याला लय मिळाली, तर तो भारताला आगामी वनडे विश्वचषक देखील मिळवून देऊ शकतो. त्याने अनेकदा आपल्या संघाला एकट्याच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे.
(These are the five options India have to bat on number four in the 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
ऐकावं ते नवलंच! वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र घटना, गोलंदाजाने एका सामन्यात फेकल्या 11 ओव्हर्स
अमेलिया-सोफीच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा दमदार विजय, श्रीलंकेला 111 धावांनी पत्करावी लागली हार