ऑस्ट्रेलियाचा संघाचा बांगलादेश दौरा ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, त्यापूर्वी बांगलादेशला मोठा फटका बसला आहे. बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटन दास वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया विरूद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी मालिकेत खेळणार नाही.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे क्रिकेट संचालक अकरम खान यांनी सांगितले की आपल्या आजारी कुटुंबातील व्यक्तीला लिटन दास भेटण्यासाठी जाणार असल्याने तो कदाचित खेळू शकणार नाही.
लिटन दास आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीजवळ थांबणार
क्रिकबजच्या एका रिपोर्ट नुसार लिटन दास ऑस्ट्रेलिया विरूद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. बीसीबी क्रिकेट संचालकांनी क्रिकबजला माहिती दिली की ‘लिटन लवकरच लवकर घरी जाणे अपेक्षित आहे. कारण कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या जवळ राहण्याची त्याची इच्छा आहे. तो झिम्बाब्वेमध्ये सुरूवातीच्या दोन टी-२० सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. जर कोणी आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या जवळ राहणार असल्याची इच्छा व्यक्त करीत असेल, तर आम्ही काहीच करू शकणार नाही.’
याअगोदर मुशफिकुर रहीमचासुद्धा झिम्बाब्वे दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी संघामध्ये सहभाग नव्हता. तो पण आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी आला होता आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध होण्याऱ्या मालिकेतूनही तो बाहेर पडला आहे. मुशफिकुर रहीम निर्धारित वेळेच्या विलगीकरणासाठी आला नव्हता. अशातच बीसीबी जवळ त्याला बाहेर ठेवण्यावाचून कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.
जखमी खेळाडूंची चिंता बांगलादेशला सतावतेय…
बांगलादेशला जखमी झालेल्या खेळाडूंची पण चिंता आहे. कारण मुस्तफिजुर रहमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेला सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्याला याच महिन्याच्या सुरूवातीला एका सामन्यादरम्यान अंगठ्याला जखम झाली होती. सौम्य सरकार व शाकीब अल हसन यांच्या बाबतीत असं सांगितलं जात आहे की या दोघांना पण कमरेच्या दुखापतीमुळे समस्या निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आक्रमक फलंदाजी बनलीय ‘या’ खेळाडूंची ओळख, वनडेत १२०पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने कुटल्यात धावा