भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय सध्याच्या परिस्थितीत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या सुरुवातीला बीसीसीआयने एक जबरदस्त चाल चलली होती आणि तब्बल १२,००० कोटी रुपये स्वतःच्या तिजोरीत टाकले होते. आता आयपीएल २०२३ हंगाम सुरू होण्यासाठी अजून बराच काळ जावा लागणार आहे, पण यापूर्वीच बीसीसीआयने एक असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांची तिजोरीत हजारो कोटींची भर पडणार आहे.
आयपीएल २०२२ मध्ये बीसीसीआयने गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांना सहभागी केले आणि १२,००० कोटी रुपये कमावले. आता आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी बीसीसीआय त्यांचे मीडिया राईट्स विकणार आहे. पुढच्या वर्षी आयपीएलचा १६ वा हंगाम खेळला जाणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने हे राईट्स अशा कंपनीला देणार आहे, जी त्यांना मोबदल्यात सर्वाधिक पैसै द्यायला तयार असेल.
आयपीएलचे मीडिया राईट्स विकण्यासाठी बीसीसीआयने लिलावाचे आयोजन केले आहे. लिलावात पाच मोठ्या कंपन्या सहभाग घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार आयपीएलचे मीडिया राईट्स खरेदी करण्यासाठी सोनी, झी , डिजनी प्लस हॉटस्टार, वायकाम १८ आणि ऍमेझॉन या प्रमुख कंपन्या इच्छुक आहेत. सध्या मनोरंजन श्रेत्रात या पाचही कंपन्यांची व्याप्ती मोठी आहे आणि त्या आयपीएल राईट्स खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजू शकतात.
बीसीसीआयने आयपीएलचे मीडिया राईट्स विकण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि १२ जुलै रोजी यासाठी लिलाव सुरू होईल. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार लिलावाचा निकाल २४ ते ४८ तासांच्या आतमध्ये सार्वजनिक केला जाईल. १२ जुलै रोजी होणारा हा लिलाव आयपीएल २०२३ ते २०२७ या काळातील मीडिया राईट्ससाठी होणार आहे. बोर्डाने अशीही माहिती दिली की, यावर्षी होणारा लिलाव नवीन पद्धतीने होईल.
मागच्या वेळी जेव्हा बीसीसीआयने आयपीएल मीडिया राईट्स विकले होते, तेव्हा त्याच्या मोबदल्यात त्यांना १६,३४७ कोटी रुपये मिळाले होते. पण यावेळी विकल्या जाणाऱ्या राईट्समधून बोर्ड तब्बल ३५ ते ४० हजार कोटी रुपये कमावेल अशी शक्यता आहे. मागच्या वेळच्या तुलनेत ही रक्कम खूप जास्त आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सला मिळाली भावी संघमालकीण? मुकेश-नीता अंबानींची होणारी सूनबाई चर्चेत, वाचा तिच्याबद्दल
मलिंगा-बुमराहलाही मागे टाकेल अशी गोलंदाजी ऍक्शन! बॉलरचा व्हिडिओ पाहून मायकल वॉनही चकित
पहिला सामना गमावल्याचं दु:ख सावरतानाच न्यूझीलंडला बसला दुसरा धक्का, ‘हा’ धुरंधर मालिकेतून बाहेर